एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात 19 जानेवारीला सुनावणी - एकनाथ खडसेंचे जावई
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीकडून अटक करण्यात आली होती. गिरीश चौधरी गेल्या अनेक दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्या जामीन अर्जावर शनिवारी मुंबई सत्र न्यायालयातील कोर्टात सुनावणी झाली. मागील सुनावणीदरम्यान गिरीश चौधरी यांच्या वकिलांकडून मांडण्यात आलेल्या मुद्द्यांना ईडीकडून प्रतिउत्तर देण्यात आले. आता या याचिकेवर 19 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.
मुंबई - राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीकडून अटक करण्यात आली होती. गिरीश चौधरी गेल्या अनेक दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्या जामीन अर्जावर शनिवारी मुंबई सत्र न्यायालयातील कोर्टात सुनावणी झाली. मागील सुनावणीदरम्यान गिरीश चौधरी यांच्या वकिलांकडून मांडण्यात आलेल्या मुद्द्यांना ईडीकडून प्रतिउत्तर देण्यात आले. ईडीकडून गिरीश चौधरी यांच्या जामिनाला विरोध केला आहे. आता या याचिकेवर 19 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.
काय आहे भोसरी जमीन घोटाळा -
फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी पुण्यातील भोसरी येथे 3.1 एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप 2016 मध्ये झाला होता. 31 कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ 3.7 कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा केला गेला होता. रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप आहे.
हा भूखंड अब्बास उकानी यांच्या मालकीचा होता. त्यांच्याकडून एमआयडीसीने 1971 मध्ये तो अधिग्रहण केला होता परंतु उकानी यांना नुकसान भरपाई देण्याचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. खडसे यांनी 12 एप्रिल 2016 रोजी बैठक बोलावली आणि अधिकाऱ्यांना जमीन उकानींना परत द्यावी, की त्यांना जास्त नुकसानभरपाई द्यावी याविषयी त्वरित निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याचा दावा केला जातो. पंधरवड्यातच उकानी यांनी खडसे यांच्या नातलगांना पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी भूखंड विक्री केल्याचे समोर आले होते.