महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Eknath Khadse on Phone Tapping : भाजपमध्ये असताना माझेसुद्धा फोन टॅप झाले - एकनाथ खडसे - भाजप सरकार काळात एकनाथ खडसे फोन टॅप

भाजपचे सरकार (BJP Government) असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या कार्यकाळातच माझेसुद्धा फोन टॅपिंग (Phone Tapping) झाल्याची कबुली राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी दिली आहे.

eknath khadse
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे

By

Published : Mar 16, 2022, 6:03 PM IST

मुंबई - भाजपचे सरकार (BJP Government) असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या कार्यकाळातच माझेसुद्धा फोन टॅपिंग (Phone Tapping) झाल्याची कबुली राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी दिली आहे. त्याचबरोबर दाऊदच्या पत्नीशीही माझे संभाषण झाल्याचा आरोप लावल्याने मला मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता, असेही यावेळी खडसेंनी आवर्जून सांगितले. एकनाथ खडसे आज विधिमंडळात आले असताना त्यांनी पत्रकारांशी बोलताना विविध विषयांवर भाष्य केले.

  • माझ्यावरही दाऊदच्या पत्नीशी संबंध असल्याचे आरोप झाले -

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्यात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे विधिमंडळात आले असताना त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तरे दिली. नवाब मलिक व देशद्रोही दाऊद इब्राहिमच्या संबंधावर बोलत असताना ते म्हणाले की, माझ्यावरसुद्धा दाऊद इब्राहिमच्या पत्नीसोबत संभाषण झाल्याचा आरोप लावण्यात आला होता. पण, त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. त्या दरम्यान माझे व संजय राऊत यांचे फोन टॅपिंग झाले होते. त्यावेळी देशद्रोहाशी संबंध असल्याचा आरोपही माझ्यावर लावण्यात आला होता. त्याचबरोबर समाजविघातक कृत्य केल्याप्रकरणी माझ्यावर कारवाई करण्यात आली होती. याबाबत 2017 ला स्वतः तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्य सचिव यांना याबाबत माहिती दिली होती. दुःख फक्त या गोष्टीचे आहे की मी भाजपचा सदस्य असूनसुद्धा माझ्याबाबतीत असे घडले, असे एकनाथ खडसे यांनी यावेळी सांगितले.

  • वेळ आल्यावर मीसुद्धा सीडी बाहेर काढणार -

१२ आमदारांच्या प्रश्नावर राज्यपालांनी अजूनही मौन धारण केले आहे. यावर बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, या प्रकरणावर उच्च व सर्वोच्च न्यायालयाने स्वतः नाराजी व्यक्त केली आहे व तशा सूचनाही दिल्या आहेत. परंतु, मला आशा आहे की राज्यपाल याबाबत उचित निर्णय घेतील. सध्या देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केलेले पेन ड्राईव्ह प्रकरण गाजत आहे. त्याबाबत बोलताना यामध्ये चौकशी सुरू असून चौकशीअंति सत्य बाहेर येईल व दूध का दूध पानी का पानी होईल, असे खडसे म्हणाले. तसेच मीसुद्धा एक सीडी बाहेर काढणार आहे. योग्य वेळ आल्यावर मी ती बाहेर काढेल, असा इशाराही खडसे यांनी यावेळी दिला.

ABOUT THE AUTHOR

...view details