महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

एकनाथ खडसे बॉम्बे रुग्णालयात दाखल? अंजली दमानियांनी ट्विट करून साधला निशाणा - अंजली दमानिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे. खडसेंवर शस्त्रक्रिया होणार असून त्यासाठी ते रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती खडसेंच्या निकटवर्तीयांकडून मिळाली आहे. दरम्यान, खडसे रुग्णालयात दाखल झाल्याच्या मुद्द्यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक ट्विट केले आहे.

Eknath Khadse
Eknath Khadse

By

Published : Oct 6, 2021, 3:11 PM IST

जळगाव/मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे. खडसेंवर शस्त्रक्रिया होणार असून त्यासाठी ते रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती खडसेंच्या निकटवर्तीयांकडून मिळाली आहे. दरम्यान, खडसे रुग्णालयात दाखल झाल्याच्या मुद्द्यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी हा खोटेपणा असल्याचे सांगत खडसेंवर निशाणा साधला आहे.

दोन दिवसांपूर्वीच बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल -

एकनाथ खडसे हे दोन दिवसांपूर्वीच म्हणजेच 4 ऑक्टोबर रोजी मुंबईत बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले आहेत. ते अतिदक्षता विभागात दाखल असून, त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली आहे. खडसेंवर किडनीची शस्त्रक्रिया होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

अंजली दमानिया यांनी केलेले ट्विट
खडसे भोसरीतील भूखंड गैरव्यवहार प्रकरणात आहेत ईडीच्या रडारवर -
एकनाथ खडसे व त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे या पुण्यातील भोसरी येथील वादग्रस्त भूखंड खरेदी प्रकरणात ईडीच्या रडारवर आहेत. या प्रकरणात त्यांचे जावई गिरीश चौधरी अटकेत आहेत. दरम्यान, या व्यवहारात मदत केल्याचा ठपका ठेऊन अटक करण्यात आलेले तत्कालीन उपनिबंधक रवींद्र मुळे यांना ईडीने गेल्या आठवड्यापूर्वी अटक केली होती. त्यांना दोन दिवसांपूर्वी जामीन मिळाला आहे. दरम्यान, सोमवारी (4 ऑक्टोबर) पीएमएलए न्यायालयाने एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना गुरुवारपर्यंत न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते.


हे ही वाचा -घरगुती गॅसच्या दरात 15 रुपयांनी वाढ; जाणून घ्या, नवे दर

सत्र न्यायालयाला वकिलांनी दिली खडसेंबाबत माहिती?

दरम्यान, या साऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक ट्विट करून खडसेंना लक्ष्य केले. आपल्या ट्विटमध्ये दमानिया यांनी, 'आज सत्र न्यायालयात खडसेंच्या वकिलांनी खडसेंबाबत माहिती दिली. खडसेंना अपंगत्व असून, त्यांना हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. हा खोटेपणाचा कळस आहे. न्यायालयासमोर प्रत्यक्ष हजर न राहण्यासाठी हे खोटे सांगितले जात आहे', असे दमानिया यांनी नमूद केले आहे. दमानिया यांच्या या ट्विटची जोरदार चर्चा आहे.

हे ही वाचा -'या' तिघांना सर्वात अगोदर केली अटक, ड्रग्ज पार्टीतील मूनमून धामेचा कोण?

मूत्र मार्गाच्या संसर्गामुळे यापूर्वी खडसेंवर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार -

मुंबई - ईडीच्या रडारवर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची प्रकृती पुन्हा बिघडली असून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. न्यायालयात खडसेंच्या वकिलांनी यासंदर्भात आज माहिती दिली. दरम्यान, मूत्र मार्गाच्या संसर्गामुळे यापूर्वी खडसेंवर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे आणि त्यांचे कुटुंबीय ईडी चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना जुलै महिन्यात ईडीने ताब्यात घेतले. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात गिरीश चौधरी यांना अटक केली आहे. खडसे देखील ‘ईडी’च्या चौकशीला सामोरे जात आहेत. आज पुणे भोसरी येथील भूखंड प्रकरणी ईडीने राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी समन्स बजावले होते. न्यायालयात खडसे हजर राहणार होते. मात्र, खडसेंची प्रकृती अस्वस्थ असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया होत आहे, त्यासाठी ते बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत, अशी माहिती एकनाथ खडसेंच्या वकिलांनी न्यायालयात दिली. त्यामुळे आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details