महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 12, 2022, 10:36 AM IST

ETV Bharat / city

Bangladeshi in Mumbai : बनावट कागदपत्र बनवून मुंबईत राहणाऱ्या आठ बांगलादेशी आरोपींना चार वर्षाची शिक्षा

भारतीय नागरिकत्वाचे बनावट कागदपत्र भरून मुंबईत रहिवासी असलेल्या आठ बांगलादेशी ( Eight Bangladeshi accused living in Mumbai )नागरिकांना दोषी ठरवत मुंबई सत्र न्यायालयाने चार वर्षाची शिक्षा आज (11 ऑक्टोबर ) सुनवली आहे. मुंबई सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. ए. जोगळेकर यांनी 8 आरोपींना आयपीसीच्या संबंधित कलमांतर्गत फसवणूक केल्याच्या आरोपाविरोधात ही शिक्षा सुनावली आहे.

Bangladeshi in Mumbai
आठ बांगलादेशी नागरिकांना दोषी ठरवत मुंबई सत्र न्यायालयाने चार वर्षाची शिक्षा सुनवली

मुंबई - बांग्लादेशी नागरिकांनी मुंबईत घुसखोरी केल्याचे प्रकरण समोर आले आहे. भारतीय नागरिकत्वाचे बनावट कागदपत्र भरून मुंबईत रहिवासी असलेल्या आठ बांगलादेशी नागरिकांना ( Eight Bangladeshi accused living in Mumbai ) दोषी ठरवत मुंबई सत्र न्यायालयाने चार वर्षाची शिक्षा आज (11 ऑक्टोबर) सुनवली आहे.

एटीएसकडून मिळाली माहिती -आतंकवादविरोधी पथकाकडून ( Anti terrorist squad )2018 मध्ये घुसखोरी करून मुंबईत बांग्लादेशी नागरिक राहत असल्याची माहिती दिली होती. त्या आधारावर छापेमारी करण्यात आली होती. छापेमारीत केल्यानंतर आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

न्यायालयाचा निकाल -मुंबई सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. ए. जोगळेकर यांनी 8 आरोपींना आयपीसीच्या संबंधित कलमांतर्गत फसवणूक तसेच परदेशी नागरिक अध्यादेश परदेशी नागरिक कायद्याच्या तरतुदींखालील गुन्ह्यांमध्ये दोषी आढळल्यामुळे चार वर्षांची शिक्षा सुनावली आहे. शिक्षा सुनावलेल्या आरोपींमध्ये करीम शेख, अपन शेख, सोहेल शेख, मासुम शेख, सुजन शेख, शरीफुल शेख, तुहेल रहमान शेख आणि रिदोई राजो शेख यांचा समावेश आहे.

आठ बांगलादेशी नागरिकांना दोषी ठरवत मुंबई सत्र न्यायालयाने चार वर्षाची शिक्षा सुनवली

बनावट कागदपत्रांच्या आधारे केली घुसखोरी - आतंकवादविरोधीने पथका दिलेल्या तक्रारीनुसार मार्च 2018 मध्ये एक गुप्त माहिती मिळाली होती की काही बांगलादेशी रहिवासी कांदिवली उपनगरात बेकायदेशीरपणे वास्तव्य करत आहे. त्यानुसार तपास यंत्रणेने ते राहत असलेल्या परिसरात छापा टाकला. तपासदरम्यान आरोपी बांग्लादेशी असल्याचे समोर आले. त्यावेळी सहआरोपींपैकी एकाने त्यांना बोगस कागदपत्रांच्या आधारे भारतात आणल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा ( crime against eight Bangladeshi ) दाखल करण्यात आला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details