मुंबई -शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा केली आहे. दहावीची परीक्षा रद्द करण्यात आल्या. दहावीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत गुणांवर पास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना अधिक गुण मिळविण्याची अपेक्षा आहेत. त्यांच्या सोयी सुविधेसाठी लवकरच अभ्यास करून निर्णय जाहीर करू, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
दहावीची परीक्षा रद्द, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा - mumbai breaking news
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा केली आहे. दहावी परीक्षा रद्द करण्यात आल्या. दहावीच्या विद्यार्थ्यांना इंटरनल गुणांवर पास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना अधिक गुण मिळविण्याची अपेक्षा आहेत. त्यांच्या सोयी सुविधेसाठी लवकरच अभ्यास करून निर्णय जाहीर करू, असे वर्षा गायकवाड यांनी जाहीर केला.
कोरोनामुळे परीक्षा रद्द-
केंद्रीय शिक्षण मंडळाने (सीबीएसई) आणि इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन (आयसीएसई) प्रमाणेच महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज निर्णय घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. देशभरात कोरोनाचा कहर सुरू असून दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णसंख्येत वाढ होत आहे. वाढत्या प्रादुर्भावादरम्यान, विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात न घालता कित्येक परिक्षा आतापर्यंत रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सीबीएसई दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आल्यानंतर आता आयसीएसई बोर्डाने देखील दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुण देणार-
शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 12 एप्रिलला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आमची बैठक झाली होती. त्या बैठकीत दहावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या संबंधित आम्ही इतरही बोर्डाला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बोर्डाने सुद्धा दहावीच्या परीक्षा रद्द केले आहेत. त्याचप्रमाणे आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण विभागात दहावीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर करण्याच्या निर्णय लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे दहावीच्या ज्या विद्यार्थ्यांना गुण जास्त मिळण्याची अपेक्षा आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आम्ही लवकरच अभ्यास करून त्यांच्यावर तोडगा काढणार आहोत.
बारावीच्या परीक्षेसंदर्भात निर्णय नाही-
दहावीची परीक्षा रद्द केल्यानंतर आता बारावीच्या परीक्षेसंदर्भात सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र बारावीची परीक्षा अद्याप रद्द करण्यात आली नसून त्यासंदर्भातील तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असे सांगण्यात येत आहेत.
हेही वाचा-राज्यात लागणार टाळेबंदी, लवकरच मुख्यमंत्री करणार घोषणा