मुंबई -गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महिला नेत्यांच्या अथवा बड्या नेत्यांशी संबंधित महिला नातेवाईकांना ईडीने रडारवर घेतले आहे. कारण महिला या सॉफ्ट टार्गेट मानल्या जातात. तसेच महिलांवर कारवाई सुरू केल्यावंतर बडे नेतेही जेरीस येतात. कोण आहेत या महिला? ईडीने त्यांच्या मागे का ससेमिरा लावला आहे?
- भावना गवळी - भावना गवळी या शिवसेनेच्या वाशिमच्या खासदार आहेत. भावना गवळी महिला प्रतिष्ठान या ट्रस्टला कंपनीत परावर्तित केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी भावना गवळी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सईद खान यांना ताब्यात घेतले आहे. गवळीसुद्धा या कंपनीत संचालक होत्या. आर्थिक गैरव्यवहार केल्याचा ठपका या कंपनीवर ठेवण्यात आला आहे. त्यांनी ईडीकडे १५ दिवसांचा अवधी मागून घेतला आहे.
हेही वाचा-वहिनींना आमदार व्हायचंय! मनीषा कायंदेंचा अमृता फडणवीसांना खोचक टोला
- मंदाकिनी खडसे - मंदाकिनी खडसे या माजी महसूल मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी आहेत. पुणे येथील भोसरी भूखंड प्रकरणी त्यांच्यावर ठपका आहे. एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनी २०१६ मध्ये भोसरी एमआयडीसीतील जमीन अब्बास उकानी यांच्याकडून ३.७५ कोटी रुपयांना खरेदी केली. त्याची निबंधक कार्यालयात नोंदणी केली. या सर्व व्यवहारात सुमारे ६१ कोटी रुपयांच्या महसुलाचे नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा मोठा गैरव्यवहार असल्याचा ईडीला संशय असून याप्रकरणी मंदाकिनी खडसे यांची चौकशी सुरू आहे.
हेही वाचा-'मन्नत'वर छापा नाही, कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी आलो असल्याचे NCB अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
- वर्षा राऊत - वर्षा राऊत या शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या पत्नी आहेत. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात आली. मैत्रिणीकडून घेतलेल्या पन्नास लाख रुपयांच्या कर्जप्रकरणी ईडीच्या अधिकार्यांनी वर्षा राऊत यांना समन्स बजाविले होते. याप्रकरणी वर्षा राऊत यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला आहे.
- प्रीती श्रॉफ - प्रीती श्रॉफ या माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत. प्रीती श्रॉफ आणि त्यांचे पती राज श्रॉफ यांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे प्रमोटर कपिल आणि धीरज वाधवान यांच्याशी संबंधित एका मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात प्रीती श्रॉफ आणि राज यांचा संबंध असल्याचा संशय ईडीला आहे. जप्त केलेली मालमत्ता ३५ कोटी रुपयांची आहे. याप्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू आहे.