महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

HM Walse Patil On ED Action : केंद्र सरकारच्या सांगण्यावरून ईडीची मलिकांवर कारवाई : गृहमंत्री वळसे पाटील

नवाब मलिक ( Minister Nawab Malik ) हे पूर्णतः निर्दोष आहेत. त्यांनी अनेक प्रकरणे बाहेर काढल्यामुळेच त्यांना केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून केंद्र सरकार त्रास ( ED action against Nawab Malik ) देत असल्याचा दावा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ( Dilip Walse Patil On ED Action ) केला.

By

Published : Feb 23, 2022, 3:37 PM IST

नवाब मलिक
नवाब मलिक

मुंबई : नवाब मलिक ( Minister Nawab Malik ) यांनी अनेक प्रकरणे बाहेर काढल्यामुळे केंद्रीय यंत्रणा त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न करत आहेत. नवाब मलिक यांना आधी ईडीने नोटीस द्यायला हवी होती. मात्र, असे न करता केवळ केंद्राच्या सांगण्यावरून ही कारवाई ( ED action against Nawab Malik ) होत असल्याचा संशय आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून केंद्र सरकारने सातत्याने हा प्रकार चालवला असल्याचा आरोप राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ( Dilip Walse Patil On ED Action ) केला.

आम्हीही निर्णय घेऊ..

नवाब मलिक पूर्णपणे निर्दोष आहेत. त्यांना आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. त्यांना केवळ त्रास देण्याचा आणि अडकवण्याचा प्रयत्न सुरू असून, हे योग्य नसल्याची प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली आहे. सर्व बाबींवर आमचे लक्ष असून त्यानुसार आम्ही निर्णय घेऊ असेही ते म्हणाले. नवाब मलिक यांच्या निवासस्थानी सकाळीच ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. ईडीचे अधिकारी मलिक यांना चौकशीसाठी घेऊन गेले असून, मलिक यांना अटक करण्यात आली आहे.

घाणेरडं राजकारण थांबवा : अशोक चव्हाण
मलिक यांच्यावर होत असलेल्या कारवाईवरून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली ( Ashok Chavan On ED Action ) आहे. ते म्हणाले, 'माझं व्यक्तिगत मत आहे की, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. राजकारण या स्तरावर जाऊन पोहोचलेलं आहे. एकमेकांच्या विरोधामध्ये वाभाडे काढण्याचे काम आणि एकमेकांच्या विरुद्ध व्यक्तिगत द्वेष आहे आणि अशा पद्धतीने सुरू आहे. हा चुकीचा पायंडा पडत आहे. लोकशाहीला हे सर्व मारक आहे. तातडीने हे सर्व थांबले पाहिजे'.

..तर त्याचा सर्वांना त्रास होईल

चव्हाण म्हणाले की, 'राजकीय विरोध असू शकतो, वेगवेगळे मते असू शकतात . लोकशाहीमध्ये सर्वांनाच मान्य आहे परंतु या पद्धतीने जे सुरू आहे. ते काही बरोबर नाहीये. राजकारणाचा स्तर पडत चाललेला आहे आणि नगरपालिका, महापालिकाच्या स्तराच्यापलीकडे त्याच्या खाली स्तर गेला आहे. म्हणून नेतृत्व करणाऱ्या व्यक्तींनी याची दखल घ्यावी. हे सर्व प्रकरण थांबवून लोकशाही मार्गाने आपले विचार मांडले पाहिजेत. अतिशय खालच्या पातळीवर हे चाललेलं आहे. हे तातडीने थांबवले नाही तर त्याचा सर्वांना त्रास होईल', असेही चव्हाण म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details