मुंबई - महाविकास आघाडीच्या पुन्हा एका मंत्र्याला ईडीचे समन्स बजावले आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीचे समन्स बजावले आहे. यात त्यांनी बुधवारी चौकशीला हजर राहण्याचे निर्देश दिले आहे. मागील महिन्यात अनिल परब यांच्या संबंधित 7 ठिकाणी ईडीने छापेमारी केली होती. साई रेस्टॉरंट प्रकरणात अनिल परब यांची चौकशी यापूर्वी चौकशी केली होती. बुधवारी सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश समन्स द्वारे देण्यात आले आहे.
अनिल परबाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष - एकीकडे आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याच्या तयारीत सध्या शिवसेनेचे नेते व्यस्त आहे. अशातच शिवसेनेच्या गोटातलं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण शिवसेना नेते आणि परिहन मंत्री अनिल परब यांना ईडीने समन्स बजावले आहे. तसेच बुधवारी चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अनिल परब हे ईडीसमोर चौकशीला हजर राहणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. दापोलीतील साई रिसॉर्टप्रकरणी अनिल परब यांची चौकशी होणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच ईडीने परबांच्या मुंबईतील घरावर कार्यालयावर आणि रत्नागिरीतील रिसॉर्टवर तसेच परबांच्या निकटवर्तीयांवर धाडसत्र राबवले होते. त्यानंतर तिथल्या स्थानिक ग्रामपंयातीकडून काही कागदपत्रेही ताब्यात घेतली होती.
यापूर्वी झाली होती चौकशी - महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्यासंबंधित 7 ठिकाणी आज (दि. 26 मे) ईडीने छापेमारी केली होती. अनिल परब यांच्या संबंधित मुंबई, पुणे, रत्नागिरी छापेमारी अनिल परब यांची मुंबईतील शासकीय बंगला येथील ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली होती. विशेष म्हणजे अनिल देशमुख यांची चौकशी केल्यानंतर ज्या ईडीचा अधिकाऱ्यांनी त्यांना अटक केली होती. त्या अधिकाऱ्यानेच अनिल परब यांची चौकशी केली होती. 13 तासांच्या चौकशीनंतर ईडीचे अधिकारी अनिल परब यांच्या घरातून गेले होते. त्यानंतर पून्हा आज त्यांना ईडी कार्यालयात चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.