मुंबई - शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या मुंबई व ठाण्यातील घरावर 'ईडी'च्या पथकाने छापेमारी केल्यानंतर या संदर्भात सरनाईक यांचा मुलगा विहंग यास तब्बल 5 तास चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर विहंग सरनाईक यास सोडण्यात आले. मात्र यानंतरही पुन्हा एकदा चौकशी करण्यासाठी दोन वेळा ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. मात्र तो अद्याप चौकशीसाठी हजर झाला नसल्याचे सूत्रांकडून कळत आहे. यामुळे सक्तवसुली संचलनालयातर्फे तिसऱ्यांदा समन्स पाठवण्यात आले आहे.
प्रताप सरनाईक क्वारंटाईन; तर विहंग आजारी
'ईडी' चौकशी प्रकरण : विहंग सरनाईक यास 3 वेळा समन्स, तरीही गैरहजर - Enforcement directorate on vihang sarnaik
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरांवर 'ईडी'च्या पथकाने छापेमारी केल्यानंतर या संदर्भात सरनाईक यांचा मुलगा विहंग यास ताब्यात घेण्यात आले होते. यानंतर त्याला पुन्हा चौकशीसाठी समन्स देण्यात आला. मात्र तब्येतीचे कारण देऊन तो गैरहजर राहिल्याने ईडीने तिसऱ्यांदा समन्स बजावले आहे.
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचे कार्यालय आणि घरावर ईडीतर्फे छापेमारी करण्यात आली होती. त्यावेळी प्रताप सरनाईक शहरात नव्हते. मात्र यानंतर ते मुंबईत दाखल झाले असून क्वारंटाईन असल्याची माहिती मिळाली आहे. याबरोबरच विहंग सरनाईक यांची तब्येत खालावल्याने ते देखील ईडीच्या चौकशीसाठी हजर राहू शकत नसल्याचे कळत आहे.
अमित चांदोले याला 3 दिवसांची ईडी कोठडी
ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईत 'टॉप सिक्युरिटी'चा मालक अमित चांदोले यास अटक झाली आहे. एमएमआरडीएला सुरक्षारक्षक पोहोचवण्याच्या कंत्राटात तब्बल 175 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर तीन दिवसांची ईडी कोठडी देण्यात आली आहे.