मुंबई - वादग्रस्त कारकीर्द राहिलेले मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे ( Former Mumbai Police Commissioner Sanjay Pandey ) यांच्यामागे आता अंमलबजावणी संचालनालयाचा ( ED ) ससेमिरा लागला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Shivsena Chief Uddhav Thackeray ) यांंचे संजय पांडे हे निकटवर्तीय असल्याचे म्हटले जाते. पांडे यांना ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी 5 जुलै रोजी हजर राहण्याबाबत नोटीस जारी करण्यात आली आहे. 2 जुलै रोजीच त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. 30 जून रोजी मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन संजय पांडे निवृत्त झाले होते. त्यानंतर अवघ्या 3 दिवसांच्या आत त्यांना ईडीने नोटीस पाठवली आहे.
संजय पांडेज्यावेळी डीजी होते तेव्हा त्यांनी परमबीर सिंह यांना अनिल देशमुख यांच्याविरोधात माघार घेण्यासाठी दबाव निर्माण केला होता. तसेच एनएसई सर्वर कंप्रमाइज केस प्रकरणात त्यांना समन्स बजावण्यात आले आहे. चित्र रामकृष्णा प्रकरणात एक ऑडिट कंपनी तयार करण्यात आली होती. ही कंपनी संजय पांडे यांची होती. या दोन्ही प्रकरणी संजय पांडे यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकणात संजय पांडे यांच्यावर ईडी कारवाई करू शकते, असे म्हटले जाते.
निवृत्त होताच ईडीचा ससेमिरा - मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन नुकतंच निवृत्त झालेले आयपीएस अधिकारी संजय पांडे यांच्या पाठिमागे आता ईडीचा ससेमिरा लागला आहे. विशेष म्हणजे संजय पांडे यांना मुंबईतील ईडी कार्यालयात नव्हे तर दिल्लीतील ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे. ईडीने पाठवलेल्या समन्सनुसार संजय पांडे यांना येत्या 5 जुलैला म्हणजेच मंगळवारी दिल्लीतील ईडी कार्यालयात दाखल राहण्याचे आदेश देण्यात आला आहे. मुंबईमध्ये ईडीचे कार्यालय असताना राजधानी दिल्लीतील कार्यालयामध्ये चौकशीसाठी बोलाविण्यामागे काय उद्देश असू शकतो यावर चर्चा होऊ लागली आहे.