महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ईडीचा दणका; काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या जावयाची संपत्ती जप्त - ED action on Sushilkumar Shinde son in Law

राज श्रॉफ यांची जप्त केलेली मालमत्ता अंधेरी पूर्व येथील कॅलोडोनिया बिल्डिंगमधील आहे. दरम्यान डीएचएफएल अनेक घोटाळ्यांमध्ये सामील आहे.

ED
ईडी

By

Published : Mar 15, 2021, 10:33 PM IST

Updated : Mar 15, 2021, 10:55 PM IST

मुंंबई-काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या जावयाची ईडीने संपत्ती जप्त करण्यात आली आहे. सुशीलकुमार शिंदे यांचे जावई राज श्रॉफ यांची 35 कोटी 48 लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. ही कारवाई ईडीने डीएचएफएलचे प्रवर्तक कपिल आणि धीरज वाधवान यांंच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी केली आहे.

राज श्रॉफ यांची जप्त केलेली मालमत्ता अंधेरी पूर्व येथील कॅलोडोनिया बिल्डिंगमधील आहे. दरम्यान डीएचएफएल अनेक घोटाळ्यांमध्ये सामील आहे. पंजाब नॅशनल बँकेची डीएचएफएलकडून 3, 688 कोटींची फसवणूक करण्यात आली आहे. या कंपनीची येस बँकेच्या कर्ज घोटाळ्या प्रकरणी चौकशी सुरू आहे.

हेही वाचा-मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा केल्यानंतर शरद पवारांनी बोलाविली राष्ट्रवादी मंत्र्यांची बैठक

काय आहे येस बँक वाधवान फसवणूक प्रकरण -

येस बँकेकडून तब्बल 3 हजार 700 कोटी रुपयांचा शॉर्ट-टर्म डिबेंचर एप्रिल 2018ला डीएचएफएलमध्ये गुंतवण्यात आले होते. यासाठी वाधवान बंधूंकडून बँकेचे प्रमुख राणा कपूर यांना 600 कोटी रुपयांची रक्कम मोबदला म्हणून देण्यात आल्याचे सीबीआयने त्यांच्या आरोपपत्रात म्हटले आहे. यानंतर येस बँक डबघाईला आल्यामुळे आर्थिक संकटात सापडली होती.

हेही वाचा-२ हजार रुपयांच्या नोटांची दोन वर्षे छपाई नाही- अनुरागसिंह ठाकूर

काय आहे डीएचएफएल वाधवान फसवणूक प्रकरण -

नीरव मोदीने केलेल्या घोटाळ्यानंतर पंजाब नॅशनल बँकेची मोठी फसवणूक झाल्याचे समोर आले होते. डीएचएफएल कंपनीने पंजाब नॅशनल बँकेची 3 हजार 688.58 कोटी रुपयांचे फसवणूक केली आहे. या फसवणुकीची माहिती पीएनबीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला दिली आहे. डीएचएफएलच्या बुडित कर्ज खात्यामधून बँकेची 3 हजार 688.58 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती पीएनबीने शेअर बाजाराला दिली होती. कंपनीने काही बनावट कंपन्यांमधून बँकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे.

गेल्यावर्षी डीएचएफएलच्या दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कंपनीने अनेक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर ईडी, एसएफआयओ या संस्थांच्या नजरेत डीएचएफएल आली आहे. या कंपनीवर येस बँकेत घोटाळा केल्याचाही आरोप आहे.

Last Updated : Mar 15, 2021, 10:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details