मुंबई -खासदार भावना गवळी (Shiv Sena MP Bhavana Gawali) यांचे निकटवर्तीय असलेले सईद खान (Saeed Khan) यांची ३.७५ कोटींची मालमत्ता ईडीने गुरूवारी जप्त केली आहे. खान हे गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान (Mahila Utkarsha Pratishthan) व अन्य संस्थांच्या आर्थिक कारभारावर लक्ष ठेवत होते असा आरोप आहे. काही दिवसांपूर्वीच ईडीने त्यांना अटक केली आहे.
शिवसेना खासदार भावना गवळी यांची सध्या ईडीकडून बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी चौकशी सुरू आहे. २७ सप्टेंबरला ईडीने भावना गवळी यांना ईडीने समन्स बजावला होता. गवळी यांचे निकटवर्तीय सईद खान यांनाही ईडीकडून अटक करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा या प्रकरणात ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. ईडीने सईद खान यांची ३.७५ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.
- भावना गवळींवर आरोप काय?