महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Ed action on Raj Kundra : व्यावसायिक राज कुंद्रावर ईडीची कारवाई, मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल - Ed register case against Raj Kundra

पॉर्नोग्राफी प्रकरणी ईडीने व्यावसायिक राज कुंद्रा ( Ed action on Raj Kundra ) यांच्याविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. राज कुंद्रा हे ( Ed register case against Raj Kundra ) अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे ( Raj Kundra latest news ) पती आहे.

Ed register case against Raj Kundra
राज कुंद्रा गुन्हा नोंद ईडी

By

Published : May 19, 2022, 8:01 AM IST

Updated : May 19, 2022, 8:59 AM IST

मुंबई -पॉर्नोग्राफी प्रकरणी ईडीने व्यावसायिक राज कुंद्रा ( Ed action on Raj Kundra ) यांच्याविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. राज कुंद्रा हे ( Ed register case against Raj Kundra ) अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे ( Raj Kundra latest news ) पती आहे. राज कुंद्रा यांना लवकरच या प्रकरणात चौकशीकरिता समन्स बजावण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मुंबई पोलिसांनी 2021 साली त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

हेही वाचा -सोन्याच्या दरामध्ये घसरण, रुपया गडगडला.. असे आहेत आजचे बिटकॉइन, चांदीचे दर..

पॉर्न फिल्मचे शुटिंग करीत असल्याच्या गुन्ह्याखाली राज कुंद्राला मुंबई क्राईम ब्रँचने अटक केली होती. तो पॉर्न व्हिडिओ बनवून अ‍ॅपवर अपलोड करीत असे, असा त्याच्यावर आरोप आहे. गेल्या वर्षी (2021) त्याला न्यायालयाने 23 जुलैपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली होती. नंतर पुन्हा दंडाधिकारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता पोलिसांनी राज कुंद्राच्या कोठडीत आणखी 7 दिवसांची वाढ करण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती.

राज कुंद्रा हा पोर्नोग्राफी प्रकरणातील मुख्य सूत्रधार मानला जात आहे. राज कुंद्राची व्हिआन नावाची कंपनी असून तिचे केनरीन नावाच्या कंपनीसोबत टायअप होते. केनरीन ही कंपनी लंडन स्थित आहे. राज कुंद्राच्या भावोजींच्या मालकीची ही कंपनी आहे. त्याचे हॉट शॉट्स नावाचे एक अ‍ॅप होते. (Raj Kundra Pornography Case Mumbai Crime Branch) या कंपनीच्या सर्व कंटेंटची निर्मिती, या अ‍ॅपचे ऑपरेशन्स, अकाउंटिंग राज कुंद्राच्या मालकीच्या व्हिआन या कंपनीच्या मुंबईतील ऑफिसमधूनच होत होते. या प्रकरणाचा सखोल तपास करीत असताना हे सर्व धागेदोरे सापडले आहेत. यामध्ये काही व्हॉट्सअप ग्रुप, ई-मेल्स, अकाऊंट शीट्स सापडल्या होत्या.

फेब्रुवारी 2021 मध्ये राज कुंद्रा विरोधात तक्रार दाखल -राज कुंद्रा विरोधात फेब्रुवारी, 2021 मध्ये तक्रार दाखल झाली होती. या तक्रारीमध्ये राज कुंद्रा अश्लील सिनेमे बनवत असून ते मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून प्रसारित करत आहे, असे आरोप ठेवण्यात आले होते.

हेही वाचा -Today Petrol-Diesel Rates : 'या' शहरात पेट्रोल- डिझेलच्या दरात किंचित वाढ.. वाचा आजचे पेट्रोल- डिझेलचे दर

Last Updated : May 19, 2022, 8:59 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details