मुंबई -परमबीर सिंग ( Param Bir Singh ) यांनी अनिल देशमुखांवर १०० कोटींच्या खंडणीचे ( 100 Crore Extortion Case ) आरोप केले होते. सीबीआयने या प्रकरणाची प्राथमिक चौकशी केल्यानंतर ईडीने ( ED ) यात अनिल देशमुखांविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात ईडीने याआधीच अनिल देशमुख यांचे पीए आणि पीएस यांना अटक केली आहे. याचसोबत अनिल देशमुखांचा मुलगा ऋषिकेश देशमुखलाही ईडीने चौकशीसाठी समन्स पाठवला आहे. याच प्रकरणात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ( Former Police Commissioner Param bir Singh Statement ) यांचा आज (रविवारी) ईडीने जबाब नोंदवला आहे.
काय आहे प्रकरण?
Param Bir Singh : 100 कोटी कथित वसूली प्रकरणात परमबीर सिंग यांचा ईडीने जवाब नोंदविला - 100 कोटी कथित खंडणी प्रकरण
अनिल देशमुखांचा मुलगा ऋषिकेश देशमुखलाही ईडीने चौकशीसाठी समन्स पाठवला आहे. याच प्रकरणात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ( Former Police Commissioner Param bir Singh Statement ) यांचा आज (रविवारी) ईडीने जबाब नोंदवला आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचे वसूलीचे टार्गेट दिले होते, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसेच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याच प्रकरणात गेल्या दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या कोठडीत आहे.
TAGGED:
100 कोटी कथित खंडणी प्रकरण