मुंबई - ही आयटीची धाड पहिल्यांदाच कुणावर पडली आहे अस नाही. दरम्यान, आयटीला जी काही माहिती लागेल ती माहिती आमचे यशवंत जाधव त्यांना देतील. दरम्यान, ज्या राज्यात भाजपचे सरकार नाही त्या राज्यात या तपास यंत्रणा विरोधकांना त्रास देत आहेत. (Income Tax Raids Yashwant Jadhav Home) 'भाजपमधले सर्व दुध के धुले' आहेत अस म्हणत आम्ही घाबरत नाहीत. जी काही धाड टाकायची ती टाका. त्याला आमचे यशवंत जाधव उत्तर देतील अशी प्रतिक्रिया मुंबई मनपाच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. त्या यशवंत जाधव यांच्या निवास्थानी आल्या तेव्हा पत्रकारांशी बोलत होत्या. दरम्यान आजही (दि. २६ फेब्रुवारी) जाधव यांच्या घरामध्ये अधिकारी उपस्थित आहेत. त्यांच्यावर छाप्याची कारवाई सकाळपासून अजूनही सुरू आहे.
या तपास यंत्रणा दुधारी तलवार आहेत. त्या दोन्ही बाजूने वापरता येतात
2020 ला किरीट सोमैया यांनी माझे नाव घेतले होते. मात्र, कोणतेही पुरावे नाहीत ना कोणताही आरोप सिध्द झाला, असही पेडणेकर म्हणाल्या आहेत. या तपास यंत्रणा दुधारी तलवार आहेत. त्या दोन्ही बाजूने वापरता येतात हे लक्षात ठेवा असा इशाराही त्यांनी यावेळी दिली आहे. (Mayor Kishori Pednekar on ED, Income Tax) सत्ता गेल्यानंतर यांच्या बुडाला आग लागली आहे. आणि हेही लक्षात ठेवा छगण भुजबळ हे पहिले खरे शिवसैनिक आहेत. त्यांच्यावरही असे आरोप करत त्यांना जेलमध्ये टाकले. पण लक्षात घ्या ते आज कॅबीनेट आहेत. त्यामुळे हे असल्या कारवाया आम्ही सहन करू पण घाबरणार नाहीत असे खडे बोलही त्यांनी यावेळी सुनावले आहेत.
अशा कारवायांनी भाजपवाल्यांना आसूरी आनंद
शिसेनेला नाही तर सर्व सकरलाच डॅमेज करण्याचा यांचा प्रयत्न आहे. मात्र, हे लोकांना समजते. आणि अशा कोणत्याही कारवायांनी ना शिवसेना डॅमेज होईल ना हे सरकार डॅमेज होईल. अस काहीच होणार नाही. दरम्यान, अशा कारवायांनी भाजपवाल्यांना आसूरी आनंद होणार असेल तर हा आनंद त्यांना लखलाब असही त्या म्हणाल्या आहेत. तसेच, मी जाधव यांच्या चौकशीत कोणताही हस्तक्षेप करणार नाही असही त्या म्हणाल्या आहेत.
इन्कम टॅक्स अधिकारी सीआरपीएफ जवानांसह सकाळीच यशवंत जाधव यांच्या घरी