महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ED Action on Sanjay Raut LIVE : झुकेंगे नही! जय महाराष्ट्र; ताब्यात घेल्यानंतर संजय राऊतांचे ट्विट

ED raid on Sanjay Rauts house in Mumbai
संजय राऊत यांच्या घरी ईडीचा छापा

By

Published : Jul 31, 2022, 10:06 AM IST

Updated : Jul 31, 2022, 8:57 PM IST

20:57 July 31

संजय राऊतांच्या घरातून 11:50 लाखांची रक्कम जप्त

संजय राऊत यांच्या घरी चौकशीदरम्यान आज केलेल्या छापेमारीत घरातून 11.50 लाखांची रोकड ED ने जप्त केली आहे.

या रकमेबाबत संजय राऊत यांना ED च्या अधिकाऱ्यांनी प्रश्न केल्यावर त्यांच्याकडून उत्तर मिळालेले नाही अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळते आहे.

20:21 July 31

संजय राऊत यांच्या वकिलांची प्रतिक्रिया

आम्ही नवीन समन्स स्वीकारले आहेत, संजय राऊत यांना चौकशीसाठी आणले आहे. ईडीने आधीच महत्त्वाची वाटणारी कागदपत्रे घेतली आहेत. काही मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. मात्र पत्रा चाळीशी संबंधित कोणतीही कागदपत्रे त्यांनी घेतली नाहीत : विक्रांत साबणे, संजय राऊत यांचे वकील

18:24 July 31

अधिकारी संजय राऊत यांना घेऊन ईडी कार्यालयात

अधिकारी संजय राऊत यांना घेऊन ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. यावेळी शिवसैनिक आक्रमक झाले होते.

17:29 July 31

संजय राऊत यांच ट्विट

संजय राऊत यांच ट्विट

आप ऊस व्यक्ती को नहीं हरा सकते..

जो कभी हार नहीं मानता!

झुकेंगे नही!

जय महाराष्ट्र

17:06 July 31

संजय राऊत ईडी कार्यालयाकडे रवाना

मुंबई : पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांना त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेतल्यानंतर ईडीचे अधिकारी त्यांच्यासोबत घेऊन जात आहेत. यावेळी संजय राऊत यांनी हात उंचावले.

16:35 July 31

संजय राऊत यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला; शिवसैनिक आक्रमक

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी त्याच्या निवासस्थानावर छापे टाकल्यानंतर ईडीने त्यांना ताब्यात घेतले आहे.

16:13 July 31

नऊ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीने घेतले ताब्यात

नऊ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. आज सकाळीच ईडीने संजय राऊत यांच्या घरावर छापे टाकले होते.

15:55 July 31

संजय राऊत यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू

संजय राऊत यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. थोड्याच वेळात ईडीचे पथक राऊत यांच्या घरातून बाहेर पडणार आहे.

14:15 July 31

त्यामागील नेमके कारण तेच सांगू शकतील- अजित पवार

अनेकांना ईडीच्या नोटिसा आल्या आहेत. तपास यंत्रणा, मग ते ईडी, सीबीआय, आयटी किंवा राज्य एजन्सी असोत, त्यांच्याकडे तक्रारी आल्यावर त्या सर्व तपास करतात. संजय राऊत यांच्या बाबतीत हे वारंवार घडत आहे. त्यामुळे त्यामागील नेमके कारण तेच सांगू शकतील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिली आहे.

14:12 July 31

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांचीही ईडी अधिकाऱ्यांनी केली चौकशी सुरू

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांचीही ईडी अधिकाऱ्यांनी केली चौकशी सुरू असल्याची माहिती

प्रवीण राऊत यांच्यासोबत 55 लाखांचा झाला होता व्यवहार

या व्यवहाराच्या अनुषंगाने चौकशी झाल्याची माहिती

13:02 July 31

रस्त्यावरच ठिय्या मांडणार असल्याचा शिवसैनिकांचा निर्धार

संजय राऊत यांच्या घराच्या बाहेर ठिय्या मांडून बसलेल्या शिवसैनिकांना रस्त्यावरून पोलीसांकडून बाजूला करण्याचा प्रयत्न

मात्र शिवसैनिकांची पोलिसांबरोबर वाद-विवाद

रस्त्यावरच ठिय्या मांडणार असल्याचा शिवसैनिकांचा निर्धार

12:50 July 31

ईडीचे एक पथक दादर परिसरात पोहचले. केंद्रीय सुरक्षा एजन्सीचे कर्मचारीही एकत्र आहेत. गार्डन कोर्टाच्या इमारतीतही शोधमोहीम सुरू झाली. येथेही संजय राऊत यांच्याशी संबंधित एक मालमत्ता असल्याचे सांगितले जात आहे.

12:49 July 31

ईडी आणि भाजपाने आपली दडपशाही सुरूच ठेवल्याचा आरोप एमआयएमचे खासदार जलील यांनी केली आहे. आपल्या विरोधात बोलणाऱ्या लोकांना केवळ दडपून टाकण्यासाठी अशा पद्धतीची कारवाई होते, अशी प्रतिक्रिया औरंगाबादचे खासदार जलील यांनी राऊत यांच्यावरील ईडी कारवाईवर दिली आहे.

12:45 July 31

पत्राचाल संदर्भात स्वप्ना पाटकर यांना आलेल्या धमकी प्रकरणात चौकशीची परवानगी करिता वाकोला पोलिसांतर्फे बांद्रा महानगर दंडाधिकारी कोर्टात धाव. स्वप्ना पाटकर यांना काही दिवसांपूर्वी धमकीचे आले होते पत्र. या विरोधात त्यांनी मुंबई पोलीस आयुक्त यांना केली होती तक्रार. या प्रकरणी वाकोला पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात NC दाखल केली होती. मात्र स्वप्ना पाटकर यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या तक्रार पत्रात संजय राऊत या प्रकरणात मास्टरमाइंड असल्याचा केला होता संशय. मात्र शनिवारी स्वप्ना पाटकर आणि संजय राऊत यांची कथित ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली होती. या क्लिपमध्ये एका महिलेला अतिशय अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचे समोर आले आहे.

12:21 July 31

महाराष्ट्रात शासकीय यंत्रणांचा सुळसुळाट - किशोरी पेडणेकर

मुंबई -महाराष्ट्रात शासकीय यंत्रणांचा सुळसुळाट झाला आहे. या लोकांच्या दाबावाला बळी न पडणाऱ्या लोकांवर या यंत्रणांचा वापर होत आहे, हे स्पष्ट आहे. छगन भुजबळ यांनाही असाच त्रास दिला, अखेर कोर्टाने त्यांना क्लिनचीट दिली, अशी प्रतिक्रिया शिवसेना प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांनी दिली.

12:17 July 31

संजय राऊत यांच्यावर अटकेची टांगती तलवार; गेल्या 5 तासांपासून ईडी छापेमारी

संजय राऊत यांच्या घरी ईडीची 5 तासांपासून छापेमारी. संजय राऊत यांच्या निवासस्थानी आज सकाळी 7 वाजता ईडी अधिकारी दाखल झाले होते. दिल्लीचे अधिकारीही मुंबईत दाखल. संजय राऊत यांच्यावर अटकेची टांगती तलवार.

11:55 July 31

सीबीआय आणि ईडी स्वतंत्रपणे काम करतात, याचा राजकारणाशी संबंध नाही - मंत्री रावसाहेब दानवे

सीबीआय आणि ईडी स्वतंत्रपणे काम करतात. यांचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या मुंबईतील निवासस्थानावर ईडीच्या छाप्यांवर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया.

11:51 July 31

संजय राऊत यांना अटक करू देणार नाही; शिवसैनिकांची राऊतांच्या घराबाहेर जोरदार घोषणाबाजी

मुंबई - संजय राऊत यांना अटक करू देणार नाही. शिवसैनिकांची संजय राऊत यांच्या घराबाहेर पुन्हा जोरदार घोषणाबाजी. आधी आम्हाला अटक करा, शिवसैनिकांची मागणी. भाजप आणि किरीट सोमैया यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी.

11:18 July 31

संजय राऊत यांनी आपल्या घराच्या खिडकीतून समर्थकांकडे केले हातवारे

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरी छापा टाकला आहे. अधिकाऱ्यांकडून राऊत यांची चौकशी होत आहे. या दरम्यान संजय राऊत यांनी आपल्या घराच्या खिडकीतून समर्थकांकडे हातवारे केले.

11:13 July 31

गुडमॉर्निंग संज्याचे बारा वाजले, निलेश राणेंची ट्विटरवरून संजय राऊतांवर टीका

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरी छापा टाकला आहे. अधिकाऱ्यांकडून राऊत यांची चौकशी होत असताना राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया पुढे येत आहेत. राऊत यांच्यावरील कारवाईनंतर निलेश राणे यांनी त्यांच्यावर टीक केली आहे. गुडमॉर्निंग संज्याचे बारा वाजले, असे निलेश राणे यांनी ट्विट करून म्हटले आहे.

10:39 July 31

फ्रंटलाईनवर खेळू शकत नाही म्हणून भाजपकडून तपास यंत्रणांचा वापर - शिवसेने प्रवक्ते आनंद दुबे

लोकसभेच्या अधिवेशनामुळे मुदत मिळावी, अशी मागणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली होती. आज सगळे खासदार घरी आले आणि सकाळी ईडीची कारवाई झाली. भाजप फ्रंटलाईनवर खेळू शकत नाही म्हणून तपास यंत्रणांचा वापर करते, असा आरोप शिवसेनेचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी केला.

10:25 July 31

कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही, मी शिवसेनेसाठी लढत राहीन - संजय राऊत

कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. मी शिवसेनेसाठी लढत राहीन, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी ट्विटरवरून दिली आहे.

10:19 July 31

संजय राऊत यांच्या घरासमोर शिवसैनिकांचा ठिय्या

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरी छापा टाकला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना कार्यकर्त्यांनी ईडीचा विरोध करत संजय राऊत यांच्या घरासमोर ठिय्या मांडला आहे.

10:14 July 31

काय आहे पत्राचाळ घोटाळा?

काय आहे पत्राचाळ घोटाळा? -मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा म्हाडा भूखंड आहे. पत्राचाळ जमीन घोटाळा 1 हजार 34 कोटी रुपयांचा आहे. पत्राचाळमध्ये राहणाऱ्या 672 भाडेकरूंना सदनिका देण्याची योजना सरकारने आखली. तेव्हा हा घोटाळा सुरू झाला. ही चाळ विकसित करण्याचे कत्रांट महाराष्ट्र गृहनिर्माण व विकास प्राधिकरणाने प्रवीण राऊत यांच्या गुरू आशिष कन्स्ट्रक्शन या कंपनीला दिले होते.

10:08 July 31

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या अटकेची शक्यता

मुंबईतील पत्राचाळ प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या ( Shiv Sena leader MP Sanjay Raut) भांडूप येथील घरी आज ईडीने धडक देत कारवाईला सुरुवात केली. ईडीने यापूर्वी ( ED Officers ) दोनदा समन्स बजावले होते. संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने त्यांनी वेळ मागवून घेतली ( ED Raid Sanjay Raut home ) होती. मात्र, सकाळपासूनच कारवाईला सुरुवात केल्याने राऊत यांच्या अटकेची शक्यता वर्तवली जात आहे.

09:37 July 31

त्यामागील नेमके कारण तेच सांगू शकतील- अजित पवार

मुंबई - शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरी ईडीने छापा टाकला आहे. ईडीचे अधिकारी संजय राऊतांच्या घरी उपस्थित आहेत. शिवसैनिकांनी संजय राऊत यांच्या घराबाहेर ठिय्या दिला आहे.

Last Updated : Jul 31, 2022, 8:57 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details