महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

एकनाथ खडसे यांना ईडीने बजावले समन्स - राजकीय बातमी

भाजपामधून राष्ट्रवादीत गेलेल्या एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचालनालयने (ईडी) समन्स बजावला. ईडीकडून खडसे यांना उद्या सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

समन्स
समन्स

By

Published : Jul 7, 2021, 8:31 PM IST

मुंबई -भाजपामधून राष्ट्रवादीत गेलेल्या एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचालनालयने (ईडी) समन्स बजावला. ईडीकडून खडसे यांना उद्या सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. पुणे इथल्या भोसरी भागातील जमीन घोटाळ्याप्रकरणी बुधवारी एकनाथ खडसे यांना ईडीकडून एक धक्का देण्यात आला. ईडीने एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक केली आहे. गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर एकनाथ खडसे यांना ईडीने समन्स बजावला आहे.

भोसरीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणी कारवाई

भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी एकनाथ खडसे यांची जानेवारी महिन्यामध्ये चौकशी करण्यात आली होती. त्याच्या अगोदर देखील या प्रकरणी ईडीने समन्स बजावले होते. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी हायकोर्टात धाव घेतली होती. भाजपाला सोडचिठ्ठी देऊन आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने आपल्यावर ही कारवाई करण्यात येत असल्याचे एकनाथ खडसे यांनी अनेकदा म्हटले होते.

प्रकरण नेमके आहे तरी काय?
खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे व जावई गिरीश चौधरी यांनी २८ एप्रिल २०१६ रोजी भोसरी एमआयडीसी येथील सव्‍‌र्हे क्र. ५२/२ अ ही जमीन अब्बास रसुलभाई उकानी नामक मूळ जमीन मालकाकडून ३.७५ कोटी रुपयांना खरेदी केली. नोंदणी निबंधकांच्या कार्यालयात या व्यवहाराची रीतसर नोंद केली. अशा प्रकारे एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या व त्यांच्या मालकीच्या जमिनीचे खडसे कुटुंबीय सरकारी कागदोपत्री मालक झाले.

हेही वाचा -MODI Cabinet Expansion : 'या' कारणांमुळे महाराष्ट्रातील चार नेत्यांना मिळाली केंद्रीय मंत्रिमंडळात संधी

ABOUT THE AUTHOR

...view details