महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अविनाश भोसले यांना ईडीची नोटीस, जप्त केलेली मालमत्ता रिकामी करण्याचे निर्देश - ED notice to Avinash Bhosale

अविनाश भोसले यांना ईडीची नोटीस मिळाली आहे. जप्त केलेली मालमत्ता रिकामी करण्याचे निर्देश त्यांना देण्यात आलेत. पुण्याचे व्यावसायिक अविनाश भोसले यांना सीबीआयच्या अटकेनंतर, ईडीने भोसले यांना पुण्यातील त्यांची मालमत्ता रिकामी करण्यासाठी नवीन नोटीस बजावली आहे.

अविनाश भोसले यांना ईडीची नोटीस
अविनाश भोसले यांना ईडीची नोटीस

By

Published : Jun 2, 2022, 9:48 AM IST

मुंबई -अविनाश भोसले यांना ईडीची नोटीस मिळाली आहे. जप्त केलेली मालमत्ता रिकामी करण्याचे निर्देश त्यांना देण्यात आलेत. पुण्याचे व्यावसायिक अविनाश भोसले यांना सीबीआयच्या अटकेनंतर, ईडीने भोसले यांना पुण्यातील त्यांची मालमत्ता रिकामी करण्यासाठी नवीन नोटीस बजावली आहे. सदर प्रॉपर्टी गेल्यावर्षी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने जप्त केली होती.


अविनाश भोसले यांना डीएचएफएल-येस बँक फसवणूक प्रकरणात सीबीआयने अटक केली आहे. भोसले यांना सीबीआयने पुढील तपासासाठी दिल्लीला नेले आहे. अविनाश भोसले यांना मुंबईतील विशेष सीबीआय कोर्टाने ८ जूनपर्यंत सीबीआय कोठडी दिली आहे.

सविस्तर वृत्त लवकरच..

ABOUT THE AUTHOR

...view details