मुंबई -भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणात आता ईडीने एन्ट्री केली आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष NIA कोर्टात अर्ज दाखल केला होता की या प्रकरणात आर्थिक व्यवहार संदर्भात चौकशी करण्याची परवानगी देण्यात यावी. अर्ज न्यायालयाने मंजूर केला असून आता ईडी या प्रकरणातील आरोपींची पैशाच्या देवाण घेवाण संदर्भात चौकशी करणार आहे. भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषदेतील आरोपी वकील सुरेंद्र गडलिंगची चौकशी करण्या बाबत ईडीला सत्र न्यायालयाने परवानगी दिली आहे. शहरी नक्षलवाद प्रकरणाची चौकशी आता आर्थिक व्यवहाराच्या दिशेने ईडी चौकशी करणार आहे. ईडी तर्फे यासंदर्भात दाखल केलेला अर्ज मुंबई सत्र न्यायालय विशेष एनआयए कोर्टानं स्वीकारला आहे. 6 जून 2018 ला अटक झाल्यापासून गडलिंग तळोजा कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीत आहे.
आरोपी सुरेंद्र गडलिंग यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष NIA कोर्टात दोन अर्ज दाखल केले होते त्यापैकी न्यायालयाने त्यांचा एक अर्ज मान्य केला असून आठवड्यातून दोन दिवस त्यांना कारागृहामध्ये लॅपटॉप वर केस संदर्भातील काम करता येईल यासंदर्भातील निर्देश न्यायालयाने जेल प्रशासनाला दिले होते. आरोपी सुरेंद्र गडलिंग हे गेल्या चार वर्षांपासून जेलमध्ये आहे. त्यांना त्यांच्या के संदर्भातील माहिती तसेच इतर केसेस संदर्भातील रेफरन्स पाहण्याकरिता लॅपटॉपचा तसेच इंटरनेट सुविधा देण्यात करिता न्यायालयाने परवानगी दिली होते. आठवड्यातील सोमवार आणि बुधवार या दोन दिवशी ते लॅपटॉपचा उपयोग करू शकतात, असे NIA विशेष न्यायालयाने आदेशात म्हटले होते.