महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज कपूरच्या नातवाची ईडीकडून चौकशी - arman jain inquiry

दिवंगत बॉलिवूड अभिनेते राज कपूर यांचा नातू अरमान जैन याची दोन तास चौकशी ईडीकडून करण्यात आली आहे.

ARMAN JAIN
अरमान जैन

By

Published : Feb 18, 2021, 4:36 PM IST

मुंबई - मनी लॉन्ड्रिंग संदर्भात तपास करत असलेल्या ईडीकडून एमएमआरडीएला 175 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टॉप्स ग्रुपच्या संदर्भात चौकशी होत आहे. अशातच या संदर्भात दिवंगत बॉलिवूड अभिनेते राज कपूर यांचा नातू अरमान जैन याची दोन तास चौकशी ईडीकडून करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी अरमान जैन याला ईडीकडून यासंदर्भात समन्स पाठवण्यात आले होते. त्यानंतर ईडी कार्यालयामध्ये अरमान जैन याची 2 तास चौकशी झाली.

आमदार प्रताप सरनाईक व विहंग सरनाईक यांनी चित्रपटात मोठी रक्कम गुंतवल्याचा संशय

एमएमआरडीला सुरक्षारक्षक देण्याच्या नावाखाली टॉप्स सिक्युरिटीकडून 175 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. यामध्ये शिवसेना आमदार प्रताप सरनाईक व त्यांचा मुलगा विहंग सरनाईक या दोघांची चौकशी करण्यात आली आहे. ईडीच्या दाव्यानुसार अरमान जैन व विहंग सरनाईक या दोघांमध्ये संशयास्पद व्हाट्सअप चॅट मिळाले असून अरमान जैन च्या माध्यमातून काही चित्रपटांमध्ये आमदार प्रताप सरनाईक व त्यांचा मुलगा विहंग सरनाईक यांच्याकडून पैसा लावण्यात आल्याचा दावा सूत्रांनी केलेला आहे. त्यासंदर्भात ही चौकशी केली जात आहे.

टॉप्स सिक्युरिटीने पुरावले केवळ 70 टक्के सुरक्षारक्षक

एमएमआरडीएला त्यांच्याकडून बांधण्यात आलेल्या पुलांच्या सुरक्षेसाठी टॉप्स ग्रुपला कंत्राट देण्यात आले होते. यामध्ये 350 ते 500 सुरक्षारक्षकांची मागणी करण्यात आलेली होती. मात्र टॉप्स ग्रुप कडून केवळ 70 टक्के सुरक्षारक्षक देण्यात आल्याचं तपासाअंती समोर आले आहे. मात्र, 70 टक्के सुरक्षारक्षक देऊन अधिक मनुष्यबळाचा पैसा एमएमआरडीएकडून घेण्यात आल्यामुळे 175 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचं समोर आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details