मुंबई -तब्बल अडीच हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआयने लादलेल्या निर्बंधांनंतर आता ईडी ने सुद्धा या प्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. पीएमसी बँकेचे एमडी जॉय थॉमस व संचालक वारीयम सिंग यांच्या विरोधात चौकशी केली जाणार आहे.
पीएमसी बँक प्रकरणी ईडीकडून गुन्हा दाखल - ED NEWS
अडीच हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी पीएमसी बँकेवर आरबीआयने निर्बंध घातल्यानंतर आता इडीने याबाबत गुन्हा नोंद केला आहे. एमडी जॉय थॉमस व संचालक वारीयम सिंग यांची चैकशी होणार आहे.
3 ओक्टॉबरला मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या संदर्भात गुन्हा नोंदविल्यानंतर या प्रकरणी राकेश वाधवा व सारंग वाधवा या दोघांना अटक केली आहे. पंजाब महाराष्ट्र बँकेलाज्या 44 मोठ्या कर्जदार खात्यांनी चुना लावला आहे. त्यात 10 कर्ज खाती ही एचडीआयल या कंपनीशी संबंधित आहेत. सारंग वाधवा व राकेश वाधवा ह्या दोन्ही व्यक्ती एचडीआयएल या कंपनीशी संबंधित आहेत. पंजाब महाराष्ट्र बँकेत या दोघांचीही वैयक्तिक खाती असल्याचे पोलीस तापासत समोर आले आहे. एचडीआयएलची तब्बल 3500 कोटी रुपयांची संपत्ती गोठविण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण 2008 ते ऑगस्ट 2019 या कालावधीत पीएमसी बँकेकडून एचडीआयलच्या ठराविक कंपन्यांची मोठी कर्ज खाती बुडीत झाल्याने यामध्ये कर्जफेड होत नव्हती. ही बाब आरबीआयच्या निदर्शनास आणता जाणीवपूर्वक ही माहिती लपवत बँकेचा खोटा व बनावट अभिलेख तयार करून तो आरबीआयला सादर केला असल्याचे पोलीस तपासात आढळून आले. या सर्व प्रकारामुळे बँकेला तब्बल 4355 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचेही आढळून आलेले आहे. या प्रकरणांमध्ये गैरव्यवहार झालेला असून मोठ्या कर्ज प्रकरणांपैकी प्रमुख कर्जदार आरोपी असलेली एचडीएल कंपनीचा मालक व बँकेचे पदाधिकारी यांच्यात संगनमत होऊन हा घोटाळा झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आलेले आहे.