ETV Bharat Maharashtra

महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

शिखर बँक घोटाळा : ईडीकडून अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल - शरद पवार

महाराष्ट्र राज्य बँकेत झालेल्या 25 हजार कोटींच्या संदर्भात मुंबई पोलिसांनी आणि 'ईडी'ने अजित पवार यांच्यासह 70 जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

अजित पवार
author img

By

Published : Sep 24, 2019, 7:55 PM IST

Updated : Sep 24, 2019, 11:23 PM IST

मुंबई- महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी ईडी कडून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह 70 जणांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे अजित पवार आणि यांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या गैरव्यवहारप्रकरणी 25 हजार कोटींची कर्जे ही नियमांचे उल्लंघन करून देण्यात आली होती. त्यामुळे यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधितांवर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हे नोंदविले होते. त्याला अनुसरून ईडीने अजित पवार यांच्यासह 70 जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

हेही वाचा -निवडणूक महाराष्ट्राची, पण प्रचाराचा मुद्दा मात्र काश्मीर!

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या 25 हजार कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह 16 जणांविरोधात आर्थिक गुन्हे शाखेने या आगोदरच एमआरए पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 22 ऑगस्टला मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात 5 दिवसात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. कलम 420, 506, 409, 465 व 467 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • काय आहे प्रकरण -

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतर्फे राज्यातील काही साखर कारखाने व सूत गिरण्यांना कोट्यवधींचे कर्ज वाटप करण्यात आले होते. मात्र, ही वाटण्यात आलेली कर्जे पुन्हा वसूल न झाल्याने बँकेला मोठ्या प्रमाणात तोटा झाला होता. कर्ज वाटप करण्याच्या काळात बँकेच्या संचालक मंडळावर अजित पवार, हसन मुश्रीफ व शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांचा समावेश होता. ज्या सूत गिरण्या व साखर कारखान्यांना कर्ज देण्यात आली त्यांचा संबंध हा राष्ट्रवादी पक्षाशी असल्याचा आरोप न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत केला होता.

  • यांच्यावर गुन्हे दाखल -

अजित पवार, विजयसिंह मोहिते पाटील, दिलीप देशमुख, राजेंद्र शिंगणे, मदन पाटील, हसन मुश्रीफ, प्रसाद तनपुरे, दिवंगत सदाशिवराव मंडलिक, दिवंगत पांडूरंग फुंडकर, मिनाक्षी पाटील, आनंदराव अडसूळ, जगन्नाथ पाटील, तानाजीराव चोरगे, जयंत पाटील, जयंतराव आवळे, दिलीप सोपल, राजन तेली, विलासराव जगताप, रजनी पाटील, माणिकराव कोकाटे

Last Updated : Sep 24, 2019, 11:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details