मुंबई:माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर (anil deshmukh) दाखल करण्यात आलेला गुन्हा हा केवळ संशयाच्या आधारावर दाखल करण्यात आला आहे. ईडीला याबाबत कोणतेही ठोस पुरावे मिळाले नाहीत. या प्रकरणात सीबीआयने (CBI) भ्रष्टाचाराचा (Corruption case) गुन्हा दाखल केला होता. असा दावा अनिल देशमुखांच्या वतीने युक्तिवाद करणारे जेष्ठ वकील विक्रम चौधरी (adv vikram chaudhary) यांनी उच्च न्यायालयात केला आहे. याबाबत ईडीच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग युक्तिवाद करणार आहेत.
अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर (Bail application) लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती एमजी जमादार यांच्या एकल्पिक खंडपीठासमोर सुनावणी करण्यात आली. त्यावेळी ज्येष्ठ वकील विक्रम चौधरी यांनी म्हटले की, अनिल देशमुखांच्या विरोधात ईडीकडे पुरावेचं नाहीत.