मुंबई - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole lawyer Satish Uke ) यांचे वकील आणि सामाजिक कार्यकर्ते सतीश उके आणि त्यांचे मोठे भाऊ प्रदीप उके ( ED files chargesheet against lawyer Satish Uke ) यांच्याविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मार्च महिन्यामध्ये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. ईडीने उके बंधूंविरोधात शुक्रवारी दोषारोप पत्र मुंबई सत्र न्यायालयातील विशेष PMLA कोर्टात दाखल केले आहे.
हेही वाचा -Maharashtra Monsoon Updates : मॉन्सूनने अर्धा महाराष्ट्र व्यापला.. ५ दिवस जोरदार बसरणार..
यापूर्वी सतीश उके हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरुद्ध कायदेशीर खटले लढवल्यामुळे चर्चेत होते. अटकेवेळी उके यांनी आरोप केला होता की, राजकीय सुडापोटी आपल्यावर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उके बंधूंविरुद्ध ईडीचा मनी लाँड्रिंगचा खटला त्यांच्याविरुद्ध नागपूर येथे नोंदवलेल्या दोन वेगवेगळ्या एफआयआरवर आधारित आहे. त्यापैकी एका प्रकरणात त्यांनी सुमारे दोन दशकांपूर्वी नागपुरातील बाबुलखेडा परिसरात दीड एकर जमीन बळकावल्याचा आरोप होता. दुसऱ्या प्रकरणात भावाने बोखरे येथील मोहम्मद जाफर याच्याकडून साडेपाच एकर जमीन बळकावल्याचा आरोप आहे.