मुंबई - गेल्या दोन वर्षापासून सातत्याने महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांना टार्गेट करत असलेल्या ईडीने आता आपला मोर्चा सामाजिक कार्यकर्त्या मेघा पाटकर यांच्या कडे वळवला आहे. नर्मदा नवनिर्माण अभियान या एनजीओच्या खात्यावर काही संशयित व्यवहार झाल्याच्या आरोपात मेधा पाटकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2005 सालातील म्हणजे तब्बल 17 वर्षांपूर्वीच्या प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईडीने मेघा पाटकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
सतरा वर्षांपूर्वीच्या संशयित व्यवहारावरुन सामाजिक कार्यकर्त्या मेघा पाटकर यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल - बृन्हमुंबई चॅरिटी कमिश्नर
नर्मदा नवनिर्माण अभियान या एनजीओच्या खात्यावर काही संशयित व्यवहार झाल्याच्या आरोपात मेधा पाटकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2005 सालातील म्हणजे तब्बल 17 वर्षांपूर्वीच्या प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईडीने मेघा पाटकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
काय आहे प्रकरण
नर्मदा नवनिर्माण अभियान हे बृन्हमुंबई चॅरिटी कमिश्नर यांच्याकडे नोंदणी असलेले एनजीओ आहे. यात मेधा पाटकर या मुख्य विश्वस्त आहेत. याच एनजीओच्या बँक ऑफ इंडियाच्या अकाऊंटवर 18 जून 2005 या एका दिवशी 1 कोटी 19 लाख 25 हजार 880 रुपयांच्या देणग्या मिळाल्या. पण यात एक महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे ही सर्व रक्कम 20 वेगवेगळ्या खात्यांवरुन 5 लाख 96 हजार 294 रुपयांच्या एक समान रक्कमेच्या व्यवहारांच्या स्वरुपात जमा झाली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही रक्कम जमा करणाऱ्या एक देणगीदारांपैकी पल्लवी प्रभाकर भालेकर या त्यावेळी अल्पवयीन होत्या. पाटकर यांच्या या एनजीओला संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या माझगांव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड पूर्वीचे माझगांव डॉक लिमिटेड कडून जानेवारी 2020 ते मार्च 2021 या लॉकडाऊन काळात वेगवेगळ्या व्यवहारांमध्ये 6 टप्प्यांमध्ये 62 लाखांच्या देणग्या मिळाल्या आहेत. त्यामुळे आता या सरकारी संस्थेच्या खात्यावरुन पाटकर यांच्या खात्यावर नेमके कशा आणि कोणी देणग्या दिल्या याची चौकशी करण्यात येणार आहे.