महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ED Raids Shridhar Patankar :  उद्धव ठाकरेंच्या मेहुण्यावर ईडीची कारवाई.. ६ कोटींची मालमत्ता जप्त - Shreedhar Patankar

अंमलबजावणी संचालनालयाने ठाण्यात आज मोठी कारवाई केली ( ED Action Sridhar Patankar )आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या भावावर ईडीने कारवाई करत पुष्पक बुलियन प्रकरणात ६ कोटींची मालमत्ता जप्त केली ( Pushpak Bulian Case )आहे.

उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे

By

Published : Mar 22, 2022, 6:41 PM IST

Updated : Mar 22, 2022, 10:37 PM IST

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या मेहुण्यावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी ) कारवाई केली (ED Action Sridhar Patankar) आहे. ईडीने त्यांच्या मेहुण्याची ६ कोटी ४५ लाखांची मालमत्ता जप्त केली आहे. पुष्पक बुलियन प्रकरणात ( Pushpak Bulian Case ) ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत किरीट सोमय्या यांनी ट्विट केले ( Kirit Somaiya Tweet ) आहे.

रश्मी ठाकरेंचे आहेत भाऊ

ठाणे शहरातील नीलांबरी नामक प्रकल्पात ११ सदनिका आहेत. या मालमत्ता श्रीधर पाटणकर यांच्या मालकीच्या असल्याचे समजते. पाटणकर हे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांचे भाऊ आहेत. यापूर्वी याबाबत मनी लॉन्डरिंगप्रकरणात गुन्हा दाखल झालेला आहे. याच प्रकरणात ईडीने कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. पुष्पक ग्रुपचा हा एक भाग आहे. ईडीने जप्त केलेल्या मालमत्तेत ११ फ्लॅट्स असून, हे फ्लॅट्स नीलांबरी प्रोजेक्टमधील आहेत. हा प्रोजेक्ट श्री साईबाबा गृहनिर्माण प्रा. लि.चा आहे.

बँक अकाउंट, कागदपत्रं ताब्यात

राज्यात ईडीकडून सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांवर कारवाई केली जात असल्याची टीका सातत्याने शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून केली जात आहे. आज ईडीने राज्य़ाचे मुख्यमंत्र्यांचे मेहुणे आणि रश्मी ठाकरेंचे भाऊ श्रीधर पाटणकर यांची संपत्ती ईडीने आज जप्त करत मोठी कारवाई केली आहे. ईडीच्या या कारवाईमुळे ठाकरे सरकारसाठी हा एक मोठा धक्का समजला जात आहे. श्रीधर पाटणकर यांचे बँकेचे अकाऊंट आणि काही महत्त्वाची कागदपत्र पोलिसांच्या हाती लागली आहेत.

२०१७ मध्ये गुन्हा

साईबाबा गृहनिर्मिती ही कंपनी श्रीधर माधव पाटणकर यांच्या मालकीची आहे. श्रीधर पाटणकर हे रश्मी ठाकरेंचे भाऊ आहेत. ईडीची ही कारवाई म्हणजे थेट ठाकरे परिवार ईडीच्या रडारवर आल्याचं मानलं जात आहे. ईडीने 2017 मध्ये पुष्पक बुलियन्सच्या विरोधात मनी लॉंडरिंगचा गुन्हा नोंदवला होता. पुष्पक बुलियन्सची तब्बल 21 कोटी रुपयांची मालमत्ता यापूर्वीच जप्त करण्यात आली होती. ही मालमत्ता महेश आणि चंद्रकांत पटेल यांच्या मालकीची होती.

नेमक प्रकरण काय आहे?

2017 मध्ये 20 ते 30 कोटी रुपये पुष्पक बुलियन कंपनीने नंदकिशोर चतुर्वेदी नावाच्या व्यक्तीला हवालाच्या माध्यमातून वळते केले होते. हवाला रॅकेट चालवणाऱ्या नंदकिशोर तिवारी या व्यक्तीने दोन तीन शेल कंपन्या उभ्या करुन ते पैसे दुसऱ्या कंपन्यांना दिले. त्यानंतर ते पैसे श्रीधर पाटणकर यांच्यापर्यंत पोहचवण्यात आले असा आरोप आहे. याच प्रकरणासंदर्भात ईडीने श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्तांवर कारवाई केली आहे.

Last Updated : Mar 22, 2022, 10:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details