मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना ईडीने मनी लॉड्रिंग प्रकरणात 23 फेब्रुवारी रोजी अटक केली होती. कुर्ला येथील गोरावाला जमीन खरेदी मध्ये मनी लँडिंगच्या आरोपाखाली अटक झाल्यापासून नवाब मलिक यांच्या अडचणीत कमी होताना दिसत नाही आहे. ईडीने नवाब मलिक यांच्यासह कुटुंबीयांची मालमत्ते संदर्भातील माहिती जिल्हा निबंधकांकडून मागितली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे नवाब मलिक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तपासासाठी माहिती मागवली - मनी लॉड्रिंग प्रतिबंध कायदा 2002 च्या तरतुदींनुसार मलिक यांच्या विरोधात सुरू असलेल्या तपासाचा एक भाग म्हणून ही माहिती मागवली आहे. ईडीने 24 मार्च रोजी एका पत्राद्वारे सह जिल्हा निबंधक मुंबई उपनगर यांच्याकडे कुर्ला, वांद्रे आणि मलिक आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर असलेल्या विविध मालमत्तांच्या तपशिलांसह कागदपत्रे प्रदान करण्यासाठी माहिती मागवली आहे. नवाब मलिक सध्या पीएमएलए कायद्यान्वये अटकेत आहे. ईडीने संयुक्त जिल्हा निबंधकांना प्रती दस्तऐवज आणि विभागाद्वारे राखलेले इतर रेकॉर्ड प्रदान करण्याचे आवाहन केले आहे. ज्यामध्ये दस्तऐवज उक्त मालमत्तेची मालकी दर्शवते. संबंधित मालमत्ता मलिक, त्याची पत्नी मेहजबीन आणि मुलगा फराज यांच्या नावावर असल्याचे सांगण्यात येत आहे. ईडीने सांताक्रूझ पश्चिम येथील फ्लॅट क्रमांक 6, गुलामनबी मनील आणि फ्लॅट क्रमांक 501, वांद्रे वास्तू, वांद्रे पश्चिम येथील मलिक यांचा मुलगा फराज यांच्या मालकीचा तपशील मागवला आहे.