महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ED Mumbai : संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना अटक

Praveen Raut
प्रवीण राऊत

By

Published : Feb 2, 2022, 1:15 PM IST

Updated : Feb 2, 2022, 2:29 PM IST

13:12 February 02

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेले प्रवीण राऊत यांना आज पहाटे त्यांना अटक केली आहे. प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी त्यांना ईडीने अटक केली आहे. प्रवीण राऊत यांना मुंबईतील सत्र न्यायालयातील PMLA कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

मुंबई :एचडीआयएलमधील 1 हजार 34 कोटींचा घोटाळा (1,034 crore scam in HDIL) समोर आल्यानंतर आता प्रविण राऊत (ED arrests Praveen Raut) यांना अटक करण्यात आली आहे. प्रविण राऊत यांच्या पत्नीच्या खात्यामधून संजय राऊत यांच्या पत्नीच्या खात्यामध्ये पैसे टाकण्यात आले होते आणि याचे पुरावे ईडीला मिळाले होते. त्यामुळे ईडीकडून अद्याप याप्रकरणी तपास सुरु आहे.

वर्षा राऊत यांना 55 लाखाचे बिनव्याजी कर्ज

1 हजार 34 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात अटक करण्यात आल्याचे समोर आले आहे. अटक प्रवीण राऊत हे एचडीआयएलची उपकंपनी असलेल्या गुरुआशिष कन्स्ट्रक्शनचे संचालक आहेत. यापूर्वी डिसेंबर 2020 मध्ये पीएमसी बँक घोटाळा प्रकरणात प्रवीण यांचे नाव समोर आले होते. प्रवीण राऊत यांची पत्नी माधुरी यांनी 2010 मध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना 55 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज (Interest free loan of Rs 55 lakh to Varsha Raut) दिल्याचे यंत्रणेच्या तपासात समोर आले होते. ज्याचा वापर मुंबईतील दादरमध्ये फ्लॅट घेण्यासाठी केला गेला होता.

संजय राऊत यांचे निकटवर्तीय
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय (Close associates of Sanjay Raut) असणाऱ्या प्रवीण राऊत यांची ईडीने मालमत्ता ईडीने जप्त केली प्रवीण राऊत यांची जवळपास 72 कोटी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. पीएमसी बँक घोटाळ्याची पार्श्वभूमीवर ईडीने प्रवीण राऊत यांना समन्स बजावत चौकशी केली होती.

काय आहे प्रकरण?
गोरेगावमध्ये गुरुआशिष कंपनीला चाळीच्या पुनर्विकासाचं काम देण्यात आलं होतं. मात्र प्रवीण राऊत यांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांच्या साथीनं या जागेतील एफएसआय परस्पर विकल्याचं प्रथमदर्शनी समोर आलं आहे. गोरेगाव पश्चिमेतील सिद्धार्थ नगर भागातील या झोपडपट्टीचं काम न करताच परस्पर काही वर्षांपूर्वी इथला एफएसआय बेकायदेशीररित्या विकण्यात आला. हा व्यवहार तब्बल 1 हजार 34 कोटी रुपयांचा होता. एचडीआयएलच्या प्रमोटर्सना पैशांची अफरातफर करण्यात मदत केली, असा आरोपही प्रवीण राऊत यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

वाधवा बंधूंच्या चौकशीत प्रवीण राऊत यांचे नाव
पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी एचडीआयएलच्या वाधवा बंधुवर कारवाई करण्यात आली होती. गोरेगाव येथील एका पुर्नविकास प्रकल्पात आर्थिक अनियमितता दिसून आली होती. नंतर या प्रकरणाचा तपास ईडीकडे गेला. वाधवा बंधू यांच्या चौकशीतून प्रवीण राऊत यांचे नाव पुढे आले. प्रवीण राऊत हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्याची माहिती समोर आली. प्रवीण राऊत यांच्या पत्नीच्या अकाउंटमधून वर्षा राऊत यांना 55 लाख रुपये देण्यात आले होते. त्यामुळेच हे पैसे का घेतले गेले? याची माहिती ईडीला हवी आहे.

55 लाख रुपये हे कर्ज स्वरुपात
विशेष म्हणजे, राज्यसभा सदस्यपदाच्या शपथ पत्रात संजय राऊत यांनी या पैशांचा उल्लेख केलेला आहे. वर्षा राऊत यांना देण्यात आलेले 55 लाख रुपये हे कर्ज स्वरुपात देण्यात आले होते असे या शपथपत्रात नमूद आहे.

Last Updated : Feb 2, 2022, 2:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details