मुंबई- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर मला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणांमध्ये ईडीने आज अटक केली आहे. मुंबई सत्र न्यायालयात पीएमएलए न्यायालयाने त्याला 7 दिवसांची ईडी कोठडीत पाठविण्याचा ( Iqbal Kaskar in ED custody ) निर्णय घेतला आहे. चासकर हा 24 फेब्रुवारीपर्यंत ईडी पोलीस कोठडीत राहणार आहे.
न्यायालयाने बुधवारी इक्बाल कासकरविरुद्ध ( Iqbal Kaskar production warrant ) मनी लाँड्रिंग प्रकरणात प्रॉडक्शन वॉरंट जारी केले होते. आज ईडीने ठाणे कारागृहातून इक्बाल कासकरचा ताबा घेतल्यानंतर त्याला मुंबई पीएमएलए न्यायालयात ( Iqbal Kaskar in PMLA court ) हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पाठविले आहे.
इक्बालचे वकील सुलतान खान ( Iqbal Kaskar Advocate Sulatan Khan ) म्हणाले, की इक्बाल हा अनेक आजारांनी त्रस्त आहे. त्यांना औषध आणि घरचे जेवण देण्यात यावे, अशी मागणी केली. न्यायालयाने त्याला परवानगी दिली. दरम्यान न्यायाधीशांनी त्याला प्रश्न विचारले. सत्र न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी इकबाल कासकरला त्याचे नाव विचारल्यानंतर ईडीच्या कोठडीत काही प्रॉब्लेम आहे का, असा प्रश्न विचारला. यावेळी इकबाल कासकरने नाही, असे उत्तर दिले.
हेही वाचा-Raosaheb Danve : रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी भजे, वडापाववर मारला ताव, हॉटेलचे बिल न देताच झाले पसार..
2017 मध्ये खंडणी प्रकरणी केली होती अटक
ईडीने दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकर याची चौकशी करण्याची परवानगी देण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. इक्बाल कासकरला ठाणे पोलिसांनी 2017 मध्ये खंडणी प्रकरणी अटक केली होती. काही वर्षांपूर्वी ठाणे पोलिसांनी इकबाल कासकर आणि अनीस इब्राहिम आणि इतरांविरुद्ध रिकव्हरी प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. त्यांची कागदपत्रे ईडीने ताब्यात घेतली आहेत. त्यानंतर इकबाल कासकरला ईडीने ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा-Arvind Kejriwal Khalistan Issue : कुमार विश्वास यांच्या आरोपावर अरविंद केजरीवाल यांचे स्पष्टीकरण, म्हणाले...
खंडणीच्या गुन्ह्यात होता कैद
इक्बाल कासकर सध्या खंडणीच्या विविध गुन्ह्यात ठाणे कारागृहात कैद होता. काही दिवसांपूर्वी मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या तपासादरम्यान ईडीने मुंबईतील अंडरवर्ल्डशी संबंधित अनेक ठिकाणी छापे टाकले होते. बेकायदेशीर मालमत्ता, बेकायदेशीर व्यवहार आणि हवाला व्यवहारांची ईडीला माहिती मिळाली आहे. त्यानंतर हे छापे टाकण्यात आले होती. त्यानंतर आता अंमलबजावणी संचालनालय इक्बाल कासकरची चौकशी करण्याच्या विचारात आहे.
हेही वाचा-Sanjay Raut Allegation Kirit Somaiya : 'एक खुनी पुन्हा एकदा अलिबागच्या भूमीवर चाललाय,' राऊतांची सोमैयावर घणाघाती टीका
ईडीचे 2 बिल्डरांना समन्स
मुंबईत मंगळवारी छापेमारीनुकतेच ईडीने 10 ठिकाणी हे छापे टाकले होते. यामध्ये 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड दाऊद इब्राहिम, त्याची बहीण हसिना पारकर, कासकर आणि गँगस्टर छोटा शकील यांच्याशी संबंधित ठिकाणांचा समावेश होता. छोटा शकील त्याच्या संबंधित असलेले सलीम फ्रूट याचादेखील ईडीने 9 तास चौकशी केल्यानंतर त्याला सोडून देण्यात आले होते. ईडीने सलीम सूट याच्याकडून काही महत्त्वाचे कागदपत्रेदेखील हस्तगत केले आहे. दाऊद इब्राहिम मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने आतापर्यंत 6 जणांचे जबाब नोंदवले आहेत. ईडीने 2 बिल्डरांना समन्स बजावले आहे.
हेही वाचा -कुमार विश्वास यांच्या आरोपांवर केजरीवाल गप्प का? राहुल गांधींचा सवाल