मुंबई - कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार, प्रवक्ते संजय राऊतांना ईडीने अटक केली आहे. त्यांचा मुक्काम सध्या आर्थर रोड तुरुंगात आहे. संजय राऊत यांना हृदयविकाराचा त्रास असल्याने न्यायालयाने त्यांना घरचे जेवण आणि औषध देण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार संजय राऊतांना घरचे जेवण दिलं जातं आहे. राऊत यांना हृदयविकाराचा त्रास असल्यामुळे ते तेलकट, तुपकट खाणे टाळत आहेत. तसेच, घरचे वरण भात आणि चपाती, भाजी असा डाएट प्लॅन संजय राऊत यांचा असल्याची माहिती सूत्रांनी दिली sanjay raut jail diet आहे.
असा मिळतो नाश्ताजेवणकारागृह प्रशासनाच्या नियमानुसार सायंकाळी ५ वाजण्याच्या आधी घरच्या जेवण तुरुंगात पाठवण्याचं असतं. त्यानुसार संजय राऊत यांना भांडुप येथील त्यांच्या मैत्री निवासस्थानाहून सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण पाठवले जाते. संजय राऊत साधारण सकाळी ९ ते ९. ३० दरम्यान नाश्ता करतात. तर दुपारचे जेवण दुपारी १ ते २ दरम्यान जेवतात. तसेच, चे जेवण ७ ते ७.३० वाजताच्यादरम्यान करतात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
२०१९ नोव्हेंबर मध्ये झाली अँजिओप्लास्टी२०१९ साली नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रातील वाढत्या राजकीय नाट्यादरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांना हृदयविकाराचा त्रास झाल्याचे आढळून आले होते. त्यानंतर वांद्रे येथील लिलावती रुग्णालयात त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. संजय राऊत यांच्या दोन धमन्यांमध्ये अडथळा आढळून आला होता आणि डॉक्टरांनी अँजिओप्लास्टीची शिफारस केली होती. ब्लॉकेजवर उपचार करण्यासाठी अँजिओप्लास्टी करण्यात आली. निर्माण झालेले अडथळे दूर करण्यासाठी तीन स्टेंट लावले गेले. त्यानंतर राऊत यांची प्रकृती स्थिर आहे.
शिवसेना नेत्यांना नाकारली भेटसंजय राऊत ( sanjay raut ) यांची भेट घेण्यास एक खासदार आणि दोन आमदारांना तुरुंग प्रशासनाने बुधवारी मनाई केली. नियमावलीनुसार कोणालाही कैद्याला भेटण्यास दिले जात नसल्याचे सांगत केवळ रक्ताच्या नात्यातील लोकांना भेटता येते, असे कारण तुरुंग प्रशासनाच्यावतीने देण्यात आले. मात्र, संजय राऊतांना भेटण्यासाठी आलेल्या राजकारण्यांना न्यायालयाचे आदेश किंवा परवानगी मिळाल्यावर भेट होऊ शकते, अशी माहिती तुरुंगातील सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा -भाजपात खांदेपालट प्रदेशाध्यक्षपदी Chandrashekhar Bawankule तर मुंबई अध्यक्षपदी आक्रमक मराठा चेहरा