मुंबई - अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या निकटवर्तीय व्यावसायिकाला अटक केली आहे. योगेश देशमुख असे या ईडीकडून अटक करण्यात आलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. 17 मार्च रोजी ईडीने योगेश देशमुख यांच्या घरावर छापेमारी केली होती. त्यावेळी योगेश देशमुख यांच्या पत्नीने ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत हुज्जत घातली होती.
हेही वाचा -नागपूर जिल्ह्यात २४ तासांत ३ हजार ७५८ नागरिकांना कोरोनाची लागण
NSEL मनी लाँड्रिंग प्रकरणात योगेश देशमुख यांना अटक झाल्याची माहिती मिळत आहे. ईडीच्या छापेमारीनंतर योगेश देशमुख यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.