मुंबई- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम च्या संदर्भातील तपास केंद्रीय गृहमंत्रालयाने यांना NIA ला 15 दिवसांपूर्वीच देण्यात आला होता. तपासादरम्यान येना गेला काही महत्त्वाच्या गोष्टी आढळून आल्यानंतर आज पहाटे चार वाजल्यापासून ईडीने दाऊद इब्राहिम च्या निकटवर्तीय असलेल्या लोकांवर 10 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. यामध्ये मुंबईतील ९ तर ठाण्यातील एका ठिकाणी छापे मारण्यात आलेत. त्यामध्ये मुंब्र्यातील एका ठिकाणाचाही समावेश आहे. या संदर्भातील ईडीकडून सर्च मोहीम सुरू असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही आहे. मात्र या गोष्टीकडे दृष्ट्या देखील करण्यात येत आहे शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत आज पत्रकार परिषद घेऊन राजकीय भूकंप करणार असल्याचे भाकीत केले होते. त्यानंतर लगेच आज पत्रकार परिषदेच्या काही तासापूर्वी पेमारे केल्याने या छापेमारी चे राजकीय चर्चा देखील सुरू आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम चा जवळचा असलेला छोटा शकीलच्या नातेवाईकाला ईडीने घेतले ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती आहे.
अंडरवर्ल्डशी संबंधित लोकांच्या जागांवर छापे टाकण्यात येत आहेत. इकबाल कासकर आणि हसिना पारकर यांच्याशी संबंधीत काही मालमत्तांवर ही कारवाई सुरू असल्याचं समजतंय. मुंबईतील मोठे नेते देखील ईडीच्या रडारवर असल्याचं समजतंय. फक्त महाराष्ट्र आणि मुंबईच नाही तर दिल्लीतून देखील तपास पथक मुंबई आल्याचे समजते. संपत्ती कराराबाबत ईडीने धाडी टाकल्या आहेत. अंडरवर्ल्डचा या करारामध्ये पैसा असल्याच्या संशयावरून ही कारवाई केली जात असल्याची चर्चा आहे. ईडी आणि एनआयएला ठोस पुरावे मिळाल्यानं या छापे टाकल्या जात आहेत. यामध्ये मोठ्या राजकीय नेत्यांचा समावेश असल्याचंही समोर येत आहे. शिवसेनेच्या पत्रकार परिषदेपूर्वी ED ची ही कारवाई होत असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.