मुंबईरक्षाबंधन हा आपला पारंपारिक सण आज साजरा होत आहे ( rakhi muhurat ). त्याचबरोबर या सणाचे औचित्य साधून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ( Azadi Ka Amrit Mahotsav ) मुंबई महापालिकेच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी 'टाकाऊतून टिकाऊ राख्या' तयार केलेल्या आहेत. या राख्या पर्यावरण पूरक असल्यामुळे त्याचे खास महत्व देखील समजून येत आहे ( Student Made Ecofriendly rakhi ). या राख्या त्यांनी आपल्या घरातील वेगवेगळे कागद, कपटे, तुकडे, रंग, कापड यांचा वापर करून तयार करण्यात आलेल्या आहे. विद्यार्थ्यांचे उपजत कला गुण आणि कौशल्य हे विकसित व्हावे, त्यात भर पडावी या उद्देशाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या निमित्ताने मुंबई महानगरपालिकेने पर्यावरण लक्षात घेऊन पर्यावरण पूरक राख्या विद्यार्थ्यांना तयार करण्याचे सांगितले ( Mumbai Municipal Corporation ). विद्यार्थ्यांनी आपल्या मनाने कुठल्याही प्लास्टिकचा वापर न करता पर्यावरण पूरक राख्या तयार केल्या पाहूया या संदर्भात सविस्तरपणे वृत्तांत
विविध वस्तूंनी बाजारपेठा सज्जराखी अर्थात रक्षाबंधन( raksha bandhan ) हा आपला भारतातला पारंपारिक क्षण आहे. भारताच्या प्रत्येक पारंपरिक सणांमध्ये लोकांचा उत्साह मांगल्य ओसंडून वाहत असते. आपण पाहतो सण आला उत्सवाला कि विविध वस्तूंनी बाजारपेठा सज्ज होतात सजतात. जनता बाजारपेठेमधून वस्तू खरेदी करतात. रक्षाबंधनाच्या काळात आपण बाजारातून अनेक प्रकारच्या राख्या घरी आणतो. बहीण भावाला ओवाळते त्यानंतर राखी बांधते. परंतू अनेक राख्यांमध्ये पर्यावरणाचा नाश करणाऱ्या म्हणजेच प्लास्टिकच्या राख्याचा वापर त्याच्यामध्ये केलेला असतो. अशा प्रकारच्या राख्या सर्वत्र दिसतात. मात्र मुंबई महानगरपालिकेने विशेष मोहीम राबवून याला फाटा देत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त पर्यावरण पूरक राख्यांची योजना राबवली.
विद्यार्थ्यांचे सुप्त गुण विकसित व्हावे त्यासाठी प्रयत्नमुंबई महानगरपालिकेने आपल्या मुलांना त्यांचे सुप्त कला गुण बाहेर यावे म्हणून विविध मंचावर त्यांना संधी देतात. आपले गुण, कौशल्य सादर करावे यासाठी उपक्रमांची मालिका आखत असतात. यंदा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हे औचित्य साधून पर्यावरण पूरक राख्या असा विषय मुलांना आणि मुलींना दिला होता. उच्च प्राथमिक आणि माध्यमिक या सर्व स्तरावरच्या विद्यार्थ्यांनी या मुंबई महानगरपालिकेच्या पर्यावरण पूरक राख्यांमध्ये सहभाग घेतला. घरातील टाकाऊ कागद कपडे रंग यांचा वापर करत त्यांनी उत्पादकतेच्या दृष्टिकोनातून अत्यंत सुबक सुसज्ज अशा राख्या तयार केल्या आहे. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी राख्यांमध्ये तिरंगाची रंगाची राखी बनवली आहे त्यामध्ये विविध खाद्यपदार्थांमधल्या बिया जसे कि, कारल्याची बी, भोपळ्याची बी, डाळिंबाची बी, अशा वेगवेगळ्या बियांचा वापर त्यामध्ये सजावटीसाठी करण्यात आलेला आहे . उल्लेखनीय बाब म्हणजे निवडक राख्या या श्रावण महिन्यातील रक्षाबंधन या सणाचे औचित्य साधून सीमेवरील देश रक्षणा करणाऱ्या जवानांसाठी सुद्धा मुलींनी राख्या पाठवल्या जाणार आहेत. अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिका सहआयुक्त अजित कुंभार यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना माहिती दिली .