नवी मुंबई : दिवाळी किंवा दीपावली (Diwali Celebration) म्हणटलं की उत्साहाचा, आनंदाचा आणि दिव्यांच्या लख्ख प्रकाशाचा सण होय. हा सण प्रत्येक जण आपआपल्या परिने साजरा करतात. मात्र, या सगळ्यांमध्ये पणती लावण्याची प्रथा सर्वत्र सारखी असते. हा दीपोत्सव भारतातच नाही, तर विदेशातही आपले लोक साजरा करतात. मुंबई येथे अश्याच पर्यावरण पुरक पणत्या (ecofriendly magic candle that burns for six hours) तयार केल्या जात आहे. आणि त्यांचे वैशिष्टय (what is in this candle) बघुन त्यांना जादुचा दिवा (magic lamp) असे नाव देण्यात आले आहे.
पर्यावरण पूरक पणत्या :मागील वीस वर्षांपासून पनवेल मधील युसूफ मेहेरअली सेंटरमध्ये पर्यावरण पूरक पणत्या बनवल्या जातात. यावर्षी देखील दिवाळीसाठी खास पणत्यांची निर्मिती करण्यात आली आहे. बेळगाव, कर्नाटक मधून येणाऱ्या टेराकोटा मातीपासून या पणत्या तयार करण्यात आल्या आहेत. पूर्ण अस्सल मातीच्या पणत्यांमुळे पर्यावरणाची कुठल्याही प्रकारची हानी होत नाही. विशेष म्हणजे या पणत्यांना जादूचा दिवा असे नाव देण्यात आले आहे.