मुंबई - बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray Shivsena) यांनी 56 वर्षांपूर्वी हिंदुत्वाचा (Shivsena Hindutva) विचार करून पक्षाची स्थापना केली आणि निवडणूक आयोग त्यांच्या पक्षावर प्रश्न उपस्थित करत आहे आणि हे महाराष्ट्रातील जनतेसाठी धक्कादायक आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut on EC) यांनी दिली आहे. तसेच दिल्लीला आमचा पक्ष नष्ट करायचा आहे. आज शिवसेनेचे एकमेव नेते उद्धव ठाकरे राहिले आहेत, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले. दरम्यान, राज्यातील सत्तानाट्यावर उद्धव ठाकरे यांची सडेतोड मुलाखत 26 आणि 27 जुलै रोजी 'सामना'वर प्रकाशित होणार आहे. संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे.
काय आहे प्रकरण -शिवसेनेवर आपला ताबा राहवा यासाठी एकनाथ शिंदे गटाकडून आता महत्त्वाच्या हालचाली करायला सुरुवात झाली आहे. शिवसेनेची ओळख असलेली त्यांची निशाणी धनुष्यबाण (bow and arrow symbol) याच्यावरच आता एकनाथ शिंदे गटाकडून दावा करण्यात आला आहे. मूळ शिवसेना आपणच असून शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण हे आपल्यालाच मिळावं यासाठी एकनाथ शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे. तर आमचे म्हणणे ऐकल्याशिवाय केंद्रीय निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेऊ नये अशी मागणी शिवसेनेकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आली (Shiv Sena before Election Commission).