मुंबई -कुर्ला ते वांद्रे-कुर्ला संकुलादरम्यान (बीकेसी) कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुविधेसाठी मध्य रेल्वेच्या कुर्ला रेल्वे स्थानकाबाहेर ई-बाइक सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना मुबलक दरात बाइक सेवा मिळणार आहे.
कुर्ला रेल्वे स्थानकाबाहेर वांद्रे कुर्ला संकुल आणि मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे प्रवाशांना वाहन पकडण्यासाठी टॅक्सी आणि रिक्षाच्या रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे प्रवाशांच्या समस्या दूर करण्याकरिता आणि पर्यावरण संवर्धनासाठी ई-बाइक सेवा सुरू केली आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना मोबाइलमध्ये युलू ॲप डाउनलोड करावे लागणार आहे. या ई बाइकसाठी प्रवाशांकडून प्रति मिनिट दीड रुपये शुल्क आकारले जाणार आहे.