महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 17, 2021, 11:22 AM IST

ETV Bharat / city

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षातून घेतला तौक्ते वादळाचा आढावा

पश्चिम किनारपट्टीवरील तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षातून आढावा घेण्यात आला. सागरी किनारपट्टीवरील जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून, प्रशासनाला बचाव कार्यासाठी सतर्क राहण्याचे निर्देश अजित पवार यांनी यावेळी दिले. मंत्रालयात उपस्थित राहून उपमुख्यमंत्र्यांकडून सकाळपासूनच वादळाच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई - राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकलेल्या तौक्ते वादळ कोकण किनारपट्टी परिसरात येऊन पोहोचले आहे. त्यामुळे किनारपट्टीवर मुसळधार पाऊस आणि वेगवान वारे वाहू लागले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज(रविवारी) सकाळी मंत्रालयातील आपत्कालिन व्यवस्थापन व नियंत्रण कक्षास भेट दिली. यावेळी राज्यातील वादळ परिस्थितीचा, बचाव व मदतकार्याच्या पूर्वतयारीचा आढावा जाणून घेतला.

नियंत्रण कक्षातून घेतला तौक्ते वादळाचा आढावा
उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी तसेच मुंबई महापालिका आयुक्तांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून उपमुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. तसेच बचाव व मदतकार्यासाठी पूर्वतयारीची माहिती घेतली. सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाने तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रालयात उपस्थित राहून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. राज्यातील वादळ परिस्थितीवर व्यक्तीश: लक्ष ठेवून आहेत. तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांच्या बचाव व मदतकार्यासाठी संबंधित जिल्हा व राज्य प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे. सध्या हे वादळ मुंबईपासून दक्षिणेला सुमारे १५० किमी अंतरावर घोंगावत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details