महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

वर्सोव्यात गणेश विसर्जनादरम्यान 5 मुले समुद्रात बुडाली - मुंबई लेटेस्ट न्यूज

मुंबईत गणेश विसर्जन शांततेत पार पडत असताना रविवारी रात्री 9 च्या सुमारास विसर्जनदरम्यान 5 मुले वर्सोवा जेट्टी येथे गेली होती. समुद्रात ही पाचही मुले बुडाली. मुले समुद्रात बुडाल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी व गावकऱ्यांनी 2 मुलांना वाचवून पालिकेच्या कूपर रुग्णालयात उपचारासाठी पाठवले आहे. त्यांच्या प्रकृतीची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.

During the immersion of Ganesha in Versova, 5 children drowned in the sea
वर्सोव्यात गणेश विसर्जनादरम्यान 5 मुले समुद्रात बुडाली

By

Published : Sep 20, 2021, 12:18 AM IST

Updated : Sep 20, 2021, 1:34 AM IST

मुंबई -गणेश विसर्जनाला समुद्रात जाऊ नका असे आवाहन पालिकेने केले होते त्यानंतरही वर्सोवा जेटी येथील समुद्रात 5 मुले रात्री 9 च्या सुमारास गणेश विसर्जनदरम्यान गेली होती. ही सर्व मुले समुद्रात बुडाली असता स्थानिक नागरिकांनी 2 मुलांना वाचवून रुग्णालयात दाखल केले आहे. इतर 3 जणांचा शोध अद्याप लागला नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

वर्सोव्यात गणेश विसर्जनादरम्यान 5 मुले समुद्रात बुडाली; शोधकार्य सुरू

5 मुले बुडाली -

मुंबईत गणेश विसर्जन शांततेत पार पडत असताना रविवारी रात्री 9 च्या सुमारास विसर्जनदरम्यान 5 मुले वर्सोवा जेट्टी येथे गेली होती. समुद्रात ही पाचही मुले बुडाली. मुले समुद्रात बुडाल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी व गावकऱ्यांनी 2 मुलांना वाचवून पालिकेच्या कूपर रुग्णालयात उपचारासाठी पाठवले आहे. त्यांच्या प्रकृतीची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.

3 मुले बेपत्ता -

मुले समुद्रात बुडाल्याची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, नेव्हीचे डायव्हर्स, लाईफ गार्ड यांनी शोध मोहीम राबवली. समुद्रात ज्या ठिकाणी मुले बुडाली त्या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरात फेरी बोट वापरून शोधकार्य सुरू केले. मात्र त्या 3 मुलांचा शोध लागला नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली.

हेही वाचा -मुंबईत सायंकाळी सहा वाजेपर्यंत ४०२५ गणेश मूर्तींचे विसर्जन

Last Updated : Sep 20, 2021, 1:34 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details