महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

msrtc loss संपामुळे गोरगरिबांची लालपरी ऑक्सिजनवर; २४ दिवसांत ३०५ कोटींचा तोटा - st workers strike msrtc loss

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे (st workers strike) एसटी महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा तोटा (msrtc loss) सहन करावा लागत आहे. संपामुळे प्रत्येक दिवशी तब्बल १३ कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. २७ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबरपर्यंत एसटी महामंडळाला तब्बल ३०५ कोटींचा तोटा (msrtc loss 305 crore rupees) झालेला आहे.

st
एसटी

By

Published : Nov 20, 2021, 10:11 PM IST

मुंबई -एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या संपामुळे (st workers strike) एसटी महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा तोटा (msrtc loss) सहन करावा लागत आहे. संपामुळे प्रत्येक दिवशी तब्बल १३ कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. २७ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबरपर्यंत एसटी महामंडळाला तब्बल ३०५ कोटींचा तोटा (msrtc loss 305 crore rupees) झालेला आहे. यामुळे तोट्यात असलेली सर्वसामान्यांची एसटी आणखी तोट्यात जात आहे.

हेही वाचा -पालिका रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णाच्या पोटातून काढला तब्बल 10 किलो 600 ग्रॅमचा गोळा

दररोज १३ कोटींच्या महसुलावर पाणी

कोरोनामुळे अगोदरच एसटी महामंडळाचा (msrtc) कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला आहे. एसटी महामंडळाचे आर्थिक चाक पूर्वगतीवर येत असतानाच ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला (st employees strike). हा संप आता चांगलाच चिघळला असून राज्यभरातील २५० आगारांपैकी २४७ आगार बंद पडले आहेत. बंद पडलेले आगार सुरू करण्याचा प्रयत्न एसटी महामंडळाकडून मोठ्याप्रमाणात करण्यात येत आहे. मात्र, आतापर्यंत पूर्णक्षमतेने बसेस धावत नाही, यामुळे प्रवाशांबरोबर एसटी महामंडळाला मोठा फटका बसला आहे.

ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी संपावर गेल्याने कोट्यावधी रुपयांचा फटका एसटी महामंडळाला बसला. एसटी महामंडळाला संपामुळे दररोज सरासरी १३ कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागले आहे. २७ ऑक्टोंबर ते २० नोव्हेंबरपर्यत एसटी महामंडळाला तब्बल ३०५ कोटींचा तोटा झाल्याची माहिती स्वत: एसटी महामंडळाकडून देण्यात आलेली आहे.

महामंडळाने तोटा वाढण्याची व्यक्त केली भीती

एसटी महामंडळाचा संचित तोटा हा 2014 - 15 आर्थिक वर्षात 1 हजार 685 कोटी रुपये होता. नंतर प्रत्येक वर्षी हा तोटा हळूहळू वाढत गेला. 2018 - 19 आर्थिक वर्षांत 4 हजार 549 कोटींवर तो पोहोचला होता. 2020 - 21 या आर्थिक वर्षांत कोरोनामुळे हा तोटा 12 हजार कोटींच्या घरात जाऊन पोहचला आहे. त्यातच आता एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे हा तोटा 13 हजार कोटींच्या घरात जाण्याची भीती एसटी महामंडळाकडून वर्तवण्यात येत आहे.

संचित तोट्याची आकडेवारी
आर्थिकवर्षसंचिततोटा (कोटींमध्ये)
2014 - 15 = 1 हजार 685
2015 - 16 = 1 हजार 807
2016 - 17 = 2 हजार 330
2017 - 18 = 3 हजार 663
2018 - 19 = 4 हजार 549
2019 - 20 = 5 हजार 192
2020 - 21 = 12 हजार 500

हेही वाचा -दहिसर रेल्वेस्थानकावर पोलिसाने पाठलाग करत चोराला पकडले; घटना सीसीटीव्हीत कैद

ABOUT THE AUTHOR

...view details