मुंबई -2019 मध्ये राज्यात झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपाला सर्वाधिक जागा मिळून सुद्धा सत्तेपासून दूर राहावे लागले होते. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीच्या नावाखाली शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्ष्यांकडून सरकार स्थापन करण्यात आले होते. त्यानंतर राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात केंद्रीय तपास यंत्रणा सक्रिय झाल्या होत्या. प्रामुख्याने शिवसेना पक्षातील नेते आणि आमदार, खासदार यांच्या विरोधात कारवाई करताना दिसले आहे. तर त्याला विरोध म्हणून राज्य सरकारने देखील भाजपा नेत्यांविरोधात ( Action against BJP leaders ) मोठ्या प्रमाणात कारवाई करत अनेक नेत्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले होते. शिंदे सरकार ( Shinde Govt ) आल्यानंतर या सर्व नेत्यांच्या विरोधातील तक्रारी थंड बसतात जाण्याची शक्यता आहे.
राज्यातील महाविकास आघाडीकडून भाजपा नेत्यांविरोधात सुरू असलेल्या कारवाया थंड होण्याची शक्यता आहे. तत्कालीन सरकारने भाजपाच्या प्रमुख नेत्यांविरोधात अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, नितेश राणे, किरीट सोमैया, निल सोमय्या यांच्यासह भाजपा नेत्यांच्या संपर्कातील असलेल्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला आणि वरिष्ठ वकील एडवोकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या संदर्भातील प्रकरण थंड होण्याची शक्यता आहे.
भाजपा नेते प्रवीण दरेकर मुंबई बँक बोगस मजूर प्रकरण :विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर बोगस मजूर प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला होता. मजूर असल्याचे सांगून त्यांनी मुंबै बँक, हजारो ठेवीदार आणि सहकार विभागाची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. आम आदमी पक्षाच्या तक्रारीवरुन दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला गेला.
सध्यस्थिती -मुंबई उच्च न्यायालयातील याचिका दरेकर यांनी बिना शर्त मागे घेतली आहे.
रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरण :राज्य गुप्तचर विभागाचे (SID) प्रमुख असताना विरोधी पक्षाच्या नेत्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप करण्याचा आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर आहे. भारतीय टेलिग्राफ कायदा, विविध कलमाखाली कुलाबा आणि पुण्यात शुक्ला यांच्याविरुध्द गुन्हा नोंदवला. शुक्ला यांना चौकशीसाठी बोलावलं गेल या प्रकरणार संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांच्या जबाबासह 20 नेत्यांचे जबाब नोंदवले गेले.
सध्यस्थिती - शुक्ला यांच्याविरुध्द ७०० पानांचे आरोप पत्र पोलिसांनी दाखल केले.
आमदार नितेश राणे संतोष परब हल्ला प्रकरण : कणवलीतील शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी निलेश राणे यांच्यावर गुन्हे दाखल झाले. त्यांना अटक करण्यात आली.
सध्यस्थिती - सिंधुदुर्ग न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.
भाजपा नेते किरीट सोमैया आणि पुत्र नील सोमैया आयएनएस विक्रांत निधी घोटाळा :आयएनएस विक्रांत ही युध्दनौका वाचविण्याच्या निमित्ताने भाजपा नेते किरीट सोमैया आणि त्यांचे पुत्र नील सोमैया यांनी ५७ कोटी रुपये गोळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात किरीट सोमैया आणि त्यांचा मुलगा नील सोमैया यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले.
सध्यस्थिती - सोमैया पिता-पुत्राना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला, चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले.
मोहित कंबोज बँक फसणूक प्रकरण :मोहित कंबोज यांच्या कंपनीने विविध बँकांचे 52 कोटी रुपयांचे कर्ज बुडवले. या आरोपाखाली मुंबई पोलीसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला. या प्रकरणात मोहित कंबोज यांच्यावर अटकेची टांगली तलवार होती.