महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

धक्कादायक : खासगी रुग्णालयाच्या एका चुकीमुळे ३ दिवसांच्या बाळासह आईला कोरोनाची लागण

'माझे लहान बाळ ३ दिवसांचे असल्याने त्याची जास्त काळजी घेण्याची गरज आहे. माझ्या बाळावर चांगले उपचार व्हावेत म्हणून पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावे' अशी मागणी बाळाच्या वडिलांनी केली आहे...

corona
कोरोना

By

Published : Apr 1, 2020, 7:33 PM IST

मुंबई - चेंबूरच्या एका खासगी रुग्णालयाच्या चुकीमुळे नुकतीच प्रसूती झालेल्या एका माहिलेला आणि तिच्या ३ दिवसाच्या बाळाला कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. या बाळाच्या वडिलांची तशी माहिती एका व्हिडिओद्वारे दिली आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी आपल्या ३ दिवसाच्या बाळाला आणि बायकोला चांगले उपचार उपलब्ध करुन द्यावेत, अशी मागणी बाळाच्या वडिलांनी केली आहे.

खासगी रुग्णालयाच्या एका चुकीमुळे ३ दिवसांच्या बाळाला आणि आईला कोरोनाची लागण

हेही वाचा...Coronavirus : दिलासादायक..! पुण्यातील 'त्या' अंगणवाडी सेविकेची कोरोनावर मात

मिळालेल्या माहितीनुसार २६ मार्चला एका महिलेला चेंबूर नाका येथील एका खासगी रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी त्या महिलेची प्रसूती सिझरिनद्वारे झाली. महिला बेशुद्ध असतानाच त्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना स्पेशल वॉर्ड खाली करण्यास सांगितला. हा वॉर्ड पालिकेने स्वच्छ करायला सांगितले असल्याचे कारण त्यांनी दिले. त्यामुळे आम्हीही त्याला नकार दिला नाही, असे या व्यक्तीने सांगितले. दुसऱ्या दिवशी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात त्यांच्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाल्याचे उघड झाले. म्हणून आपणही पत्नीसह मुलाची खासगी लॅबमध्ये १३ हजार रुपये खर्च करून कोरोनाची चाचणी केली. त्यात पत्नी आणि ३ दिवसांच्या बाळाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले, असे या व्यक्तीने व्हिडिओत सांगितले.

'मी रुग्णालयाला विनंती केली. परंतू त्यांनी तुमच्या पेशंटला कोरोना झाला असल्याने आमचा कोणताही स्टॅफ किंवा डॉक्टर येऊन तपासणार नाही, असे सांगितले. मी त्या रुग्णालयाचे बिल भरून पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात बायको आणि मुलाला भरती केले. कस्तुरबा रुग्णालयात सध्या आम्ही आहोत. मात्र, माझे लहान बाळ ३ दिवसाचे असल्याने त्याची जास्त काळजी घेण्याची गरज आहे. माझ्या बाळावर चांगले उपचार व्हावेत म्हणून पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावे' अशी मागणी बाळाच्या वडिलांनी केली आहे.

हेही वाचा...मरकझ : ३५ जणांना शोधण्यात अहमदनगर पोलिसांना यश; ११ जणांचा शोध सुरू

दरम्यान एका खासगी रुग्णालयाचा चुकीमुळे नुकतीच प्रसूती झालेल्या महिलेला आणि लहान बाळाला कोरोनाची लागण झाल्याने संबंधित खासगी रुग्णलयावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान या खासगी रुग्णालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details