महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईत अतिवृष्टीमुळे गणपती मंडपात शिरले पाणी; कार्यकर्त्यांची धावपळ - Mumbai Ganapati Festival

अतिवृष्टीमुळे मुंबईतील अनेक गणेश मंडपात पाणी शिरले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी समन्वय समितीकडून काही मंडळाना काही सूचना व करण्यात आल्या आहेत.

मुसळधार पावसामुळे मुंबईतील गेणेश मंडपात शिरले पाणी

By

Published : Sep 4, 2019, 9:26 PM IST

मुंबईत - शहरात मंगळवारपासून मुसळधार पाऊस पडत आहे. याचा फटका वाहतूक व्यवस्था व रस्त्यांवर दिसत आहे. गणेश उत्सवाच काळ आहे, रस्त्यांवर गणेश मंडळांचे मंडप उभारलेले आहेत. अति पावसामुळे या मंडपात पाणी शिरल्याचे चित्र मुंबईत सध्या कांदिवली पूर्वतील श्री कृष्ण मित्र मंडळ गणपती मंडपात दिसत आहे, अशा मुंबईतल्या अनेक गणपती मंडपात पाणी आल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोणताही अनुचीत घटना घडू नये यासाठी समन्वय समितीकडून काही मंडळाना काही सूचना व करण्यात आल्या आहेत.

अति पावसामुळे या मंडपात पाणी शिरल्याचे चित्र

बृह्नमुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात आले आहे. सर्व सार्वजानिक गणेशोत्सव मंडळाना कळविण्यात आले आहे. गणेशोत्सवा दरम्यान होत असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी मंडपात पाणी येण्याची शक्यता असल्यामुळे मंडपात पाणी जमा होऊ शकते. याची दक्षता म्हणून सर्व गणेशोत्सव मंडळानी मंडपातील वीजप्रवाह व्यवस्थित आहे की, नाही त्याची पाहणी करावी आणि शक्य झाल्यास पाऊस सुरू असताना वीजप्रवाह बंद ठेवावा, असे आवाहन सर्व गणेशोत्सव मंडळाना बृह्नमुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details