मुंबई -हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार पावसाच्या अंदाजानंतर शुक्रवारी मध्यरात्रीपासून पाऊस जोमाने बरसू लागला आहे. यामुळे मुंबईतील अनेक सखोल भागात पाणी भरले आहे. पश्चिम आणि पूर्व दोन्ही उपनगराना पावसाने झोडपले आहे. यामुळे बोरिवली, कांदिवली, येथे पाणी भरले आहे.
मुसळधार पावसाने मुंबईतील अनेक रस्ते जलमय - बोरीवली
पावसामुळे मालाड सब वे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. गोरेगाव, मालाड, मढ, मार्वे, मनोरी सह कांदिवली, बोरीवली या भागात पावसाची दमदार हजेरी काही ठिकाणी पाणी साचले आहे.
मुसळधार पावसाने मुंबईतील अनेक रस्ते जलमय
मालाड सब वे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. गोरेगाव, मालाड, मढ, मार्वे, मनोरी सह कांदिवली, बोरीवली या भागात पावसाची दमदार हजेरी काही ठिकाणी पाणी साचले आहे. पूर्व उपनगरातही जोरदार पाऊस पडत आहे.