मुंबई -बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी बंडामुळे ( Eknath Shindes revolt ) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये आता शिवसेना फक्त अस्तित्वासाठी उरली आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी केवळ ९ जिल्ह्यांमधले आमदार आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटात राहिले आहेत. शिवसेनेकडे असलेल्या ५५ आमदारांपैकी ३९ आमदार शिवसनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे ( Rebel MLA Eknath Shindes ) गटाकडे गेल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांच्या शिवसेनेकडे फक्त १६ आमदार उरले ( Shiv Sena has only 16 MLA ) आहेत. पाहूया कुठल्या जिल्ह्यात काय परिस्थिती आहे?
कुणी स्वप्नातही विचार केला नसेलअशी परिस्थिती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची झाली आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून गट स्थापन केल्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील ( Mahavikas Aghadi government ) शिवसेनेचे ३९ आमदार फुटले आहेत. सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे एकूण १६ आमदार आहेत. त्यात मुंबईचे ८ कोकणातील ३ मराठवाड्यातील ४ आणि विदर्भातील १ या आमदारांचा समावेश आहे.
मुंबई, मुंबई उपनगर - उद्धव ठाकरे यांचे मुंबई व मुंबई उपनगरात ( Mumbai, Mumbai-Suburbs ) १३ आमदार होते. त्यापैकी आदित्य ठाकरे (वरळी), अजय चौधरी (शिवडी), संजय पोतनीस (कलीना), प्रकाश फातर्पेकर (चेंबूर), सुनील प्रभू (दिंडोशी), रवींद्र वायकर (जोगेश्वरी, पूर्व), सुनील राऊत (विक्रोली), रमेश कोरगावकर (भांडुप, पश्चिम) हे ८ आमदार ठाकरे सेनेबरोबर राहिले आहेत. सदा सरवणकर (महिम), मंगेश कुडाळकर (कुर्ला), दिलीप लांडे (चांदिवली), प्रकाश सुर्वे (मागाठणे), यामिनी जाधव (भायखळा), हे ५ आमदार एकनाथ शिंदे गटासोबत गेले आहेत.
कोकण -कोकणात (Konkan) उद्धव ठाकरे यांचे १० आमदार होते. त्यातील भास्कर जाधव (गुहागर), राजन साळवी (राजापूर), वैभव नाईक (कुडाळ) हे ३ आमदार ठाकरे सेनेबरोबर राहिले असून उदय सामंत (रत्नागिरी), दीपक केसरकर (सावंतवाडी), योगेश कदम (दापोली), महेंद्र दळवी (अलिबाग), महिंद्र थोरवे (कर्जत खालापूर), भरत गोगावले (महाड), श्रीनिवास वनगा (पालघर), हे ७ आमदार एकनाथ शिंदे गटासोबत गेले आहेत.
मराठवाडा - उद्धव ठाकरे यांचे मराठवाड्यात ( Marathwada ) १२ आमदार होते. त्यापैकी संतोष बांगर (कळमनुरी), राहुल पाटील (परभणी), उदय सिंग राजपूत (कन्नड), कैलास घाडगे पाटील (उस्मानाबाद), हे ४ आमदार ठाकरे सेनेबरोबर राहिले असून प्रदीप जयस्वाल (औरंगाबाद,मध्य), धनराज चौगुले (उमरगा), बालाजी कल्याणकर (नांदेड' उत्तर), संजय शिरसाट (औरंगाबाद, पश्चिम), तानाजी सावंत (परंडा), अब्दुल सत्तार (सिल्लोड), संदिपान भुमरे (पैठण), रमेश बोरणारे (वैजापूर), हे ८ आमदार शिंदे गटासोबत गेले आहेत.