मुंबई - कोरोना व ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यात मुंबईसह ठाणे, नवी मुंबई व इतर भागात इयत्ता पहिली ते नववी व अकरावीचे वर्ग बंद करण्यात आले आहेत. ऑनलाईन शिक्षण देण्याचे आदेश काढले असून शिक्षकांना मात्र, विनाकारण शाळेत बोलावले जात आहे. शिक्षकांना वर्क फ्रॉम होम करू द्यावे अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे ( BJP Teachers Front Demand ) प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे ( BJP leader Anil Bornare Demand ) यांनी केली आहे.
शिक्षकांना संसर्गाचा धोका -
देशात वाढत्या कोरोनाच्या संक्रमणामुळे केंद्र शासनाच्या कार्यालयात ५० टक्के उपस्थिती केली आहे. मुंबईतील वाढती संख्या पाहता इयत्ता दहावी बारावी वगळता इतर वर्गाचे ऑनलाईन शिक्षण देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तथापि इयत्ता पहिली ते नववी व अकरावीच्या शिक्षकांना दररोज शाळेत बोलावले जात आहे. ऑनलाईन शिक्षण घरुनही होत असल्याने उगीच शिक्षकांना बोलावणे गैर आहे. त्यामुळे विनाकारण लोकलमध्ये गर्दी होते व कोरोना संक्रमणाचा धोका अधिक वाढतो त्यामुळे दहावी व बारावी वगळता इतर वर्गांना शिकविणाऱ्या शिक्षकांना वर्क फ्रॉम होम करू द्यावे अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी केली आहे. याबाबद त्यांनी शिक्षणमंत्री शिक्षण आयुक्त आणि शिक्षण सचिवांकडे पत्र सुद्धा पाठविले आहे.