मुंबई : सततच्या सीएनजी दरवाढीमुळे टॅक्सी-रिक्षा चालकांना व्यवसायावर मोठा परिणाम झालेला आहे. महागाईच्या काळात रिक्षा टॅक्सी चालवणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे मुंबई आणि उपनगरातील रिक्षा टॅक्सीचे भाडेवाढ होण्याची शक्यता आहे. टॅक्सी, रिक्षा भाडेवाढ झाली तर मुंबईकर प्रवाशांच्या खिशावर भार पडणार आहे.
लवकरच होणार भाडेवाढ : रिक्षा-टॅक्सीचे प्रवासी भाडे स्थिर असताना सीएनजीचे दर 25 टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे रिक्षा व टॅक्सी चालकांचे मोठे नुकसान होत आहे. सीएनजीवर चालणाऱ्या टॅक्सी व रिक्षांना अनुदानित दराने गॅस पुरवठा करण्याची मागणी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महानगर गॅस लिमिटेड कंपनीकडे केली होती. या मागणीची दखल न घेतल्यामुळे मुंबईतील टॅक्सी रिक्षा चालकाने वांद्रे-कुर्ला संकुलामध्ये असलेल्या महानगर गॅस लिमिटेडच्या कार्यालयाबाहेर आंदोलनसुद्धा केले आहे. तरीसुद्धा शासनकाकडून काही सकारात्मक उत्तर आलेले नाही. त्यामुळे मुंबईतील ऑटो रिक्षाचे भाडे लवकरच वाढू शकते. तसा रिक्षा युनियनने तसा इशारा दिला होता.