मुंबई - मुंबईमध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून ड्रग्ज विरोधात मोठी मोहीम सुरू आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणानंतर एनसीबीने मोठ्या प्रमाणात बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन उधळून लावले होते. एनसीबीकडून सातत्याने बॉलिवूडमधील कलाकारांविरोधात होत असलेल्या कारवायांमुळे आता इतर राज्यांमध्ये रेव्ह पार्टी करण्यास पसंती देत ( NCB Action Bollywood Actors ) आहेत. बेंगलोरमध्ये रविवारी अभिनेते शक्ती कपूरचा मुलगा सिद्धार्थ कपूरला एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात अटक केली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा बॉलिवूडचे ड्रग्ड कनेक्शन चर्चेत आले आहे. विशेष म्हणजे सुशांत सिंग राजपूत प्रकरणात सिद्धार्थ कपूरची बहीण श्रद्धा कपूरची एनसीबीने चौकशी केली होती.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी एनसीबीने ज्यांची चौकशी केली होती, त्यात अभिनेत्री श्रद्धा कपूरचाही समावेश होता. छिछोरे या चित्रपटात श्रद्धा आणि सुशांत एकत्र दिसले होते. प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार, लोणावळ्यातील सुशांत सिंग राजपूतच्या फार्म हाऊसवर झालेल्या पार्टीत सहभागी होण्यासाठी श्रद्धा कपूर अनेकदा आली होती. एनसीबीच्या चौकशीदरम्यान तिने पार्टीला हजेरी लावल्याची कबुलीही दिली होती. परंतु, ड्रग्जशी संबंध असल्याचा नकार तिने दिला होता. याप्रकरणी एनसीबीच्या हाती कोणताही ठोस पुरावा लागला नाही.
सिद्धांत कपूर देखील अभिनय जगताशी निगडीत आहे. मात्र, त्याची अभिनय कारकीर्द आतापर्यंत फ्लॉप ठरली आहे. 'शूटआउट अॅट वडाळा' या चित्रपटातून त्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात अनिल कपूर, कंगना रणौत आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत होते. यानंतर तो अनुराग कश्यप दिग्दर्शित अग्लीया सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपटात दिसला. सिद्धांतने त्याची बहीण श्रद्धा कपूरसोबतही स्क्रीन शेअर केली आहे. दोघेही 'हसीना पारकर' चित्रपटात एकत्र दिसले होते. या चित्रपटात श्रद्धाने दाऊदच्या बहिणीची भूमिका साकारली होती, तर सिद्धांत अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या भूमिकेत दिसला होता. सिद्धांत 'चेहरे' चित्रपटातही होता. याशिवाय त्याने 'भौकाल' नावाच्या वेब सीरिजमध्येही काम केले आहे.
सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर ड्रग्जचे प्रकरण सातत्याने तापत आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूर याला ड्रग्ज घेतल्याच्या आरोपाखाली पोलीस कोठडीत घेण्यात आले आहे. याआधी 2020 मध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाला, त्यानंतर हिंदी सिनेसृष्टी आणि टीव्ही जगतातील अनेक सेलिब्रिटींची नावे ड्रग्ज प्रकरणाशी जोडली गेली. आरोपी सिद्धांत कपूरची बहीण श्रद्धा कपूरचे नावही ओढले गेले. यादरम्यान, दीपिका पदुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांची एनसीबीने समन्स पाठवून सतत चौकशी केली.
सुशांतच्या मृत्यूनंतर एनसीबीने तपासात सर्वप्रथम रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांना अटक केली. यादरम्यान, रियाने मुंबईतील भायखळा तुरुंगात सुमारे एक महिना काढला. त्याचवेळी शौविकला अटक झाल्यानंतर तीन महिन्यांनी जामीन मिळाला. प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांनाही ड्रग्ज प्रकरणात तुरुंगात जावे लागले. दोघांच्या घरातून गांजा जप्त करण्यात आला. दोघांनीही आपण गांजा खात असल्याचे कबूल केलं. एजाज खान, गौरव दीक्षित आणि अर्जुन रामपाल, शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, राकुल प्रीत सिंग, अरमान कोहली आणि सारा अली खान यांचीही नावं ड्रग्ज प्रकरणात समोर आली आहेत. या सर्व घरांवर एनसीबीने छापे टाकले. दुसरीकडे, आर्यन खानच्या प्रकरणात क्रूझवर रेव्ह पार्टीदरम्यान एनसीबीने छापा टाकून आर्यनला अटक केली.
सुशांत सिंग ड्रग्ज प्रकरणातील नावाचं काय? ( Sushant Singh Drug Case ) -सुशांत सिंग राजपूतच्या मोबाईल मधील व्हॉट्सअप चॅटमध्ये ड्रग्ज संदर्भातील अनेकांचे नावाचा उल्लेख असल्याची माहिती त्यावेळेस सूत्रांनी दिली होती. त्यामध्ये अनेक कलाकारांचे नाव देखील होते. अभिनेत्री रिया चक्रवतीला काही दिवस जेलमध्ये देखील रहावं लागलं होतं. मात्र, व्हॉट्सअॅप चॅटमध्ये असलेल्या अन्य नावांवर एनसीबीने काय कारवाई केली?, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.