मुंबई - अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई (Drug Seized in Mumbai) केली आहे. आज करण्यात आलेल्या कारवाईत 508 ग्रॅम एम डी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अंदाजे 76 लाख 20 हजार इतकी किंमत असल्याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आले असून, एक आरोपीचा शोध सुरू आहे. या आरोपींविरोधात एनडीपीएस act नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Drug Seized in Mumbai : अंमली पदार्थविरोधी पथकाची मुंबईत मोठी कारवाई; 76 लाखांचे ड्रग्ज जप्त - अंमली पदार्थविरोधी पथकाची मुंबईत मोठी कारवाई
अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई (Drug Seized in Mumbai) केली आहे. आज करण्यात आलेल्या कारवाईत 508 ग्रॅम एम डी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अंदाजे 76 लाख 20 हजार इतकी किंमत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
आजाद मैदान पोलिसांकडून करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली असून आबीद मोहम्मद अशरफ शेख (28), रोहित सुरेश सोनी (21) तर एक आरोपी फरार असून पोलिसांकडून शोध सुरू आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथक आजाद मैदान युनिटला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, जे जे हॉस्पिटलजवळ आरोपीच्या राहत्या घरातून ड्रग्ज विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार आजाद मैदान युनिटने आरोपी आबीद शेखच्या घरी धाड टाकली असता, एमडी ड्रग्ज सापडले. त्यानंतर घराची झडती घेतली असता साउंड बॉक्सच्या आतमध्ये लपवून ठेवलेले 430 ग्राम एमडी ड्रग्ज सापडले. या आरोपीच्या घरातून एकूण 508 ग्राम एमडी ड्रग्ज सापडले असून, या ड्रग्जची बाजारात 76 लाख 20 हजार इतकी किंमत असल्याची माहिती मिळाली आहे.