मुंबई- अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर राज्यात एनसीबी म्हणजेच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो विभाग सक्रीय झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षभरात एनसीबीने जवळपास 300 अमलीपदार्थ विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. तसेच तब्बल 300 कोटी रुपयांचे अमलीपदार्थ पकडले असल्याची माहिती एनसीबीने दिली आहे. यामध्ये 30 किलो चरस, 12 किलो हेरॉईन, 350 किलो गांजा आणि 25 किलो एमडी औषध जप्त करण्यात आल्याचीही माहिती एनसीबीने दिली.
मुंबईत अमलीपदार्थ तस्कारांचे मोठे नेटवर्क पसरल्याचे गेल्या काही दिवसातील कारवायांवरून समोर आले आहे. या विरोधात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून छापेमारी करत कारयावा करण्यात येत आहेत. विदेशातून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाची तस्करी होत असल्याचेही पोलिसांच्या कारवाईत स्पष्ट होत आहे. दरम्यान अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात बॉलिवूडचे देखील अमलीपदार्थ तस्करांशी संबंध असल्याचे समोर आले होते.
एनसीबीची कारवाई -
जानेवारी महिन्यात मुंबईतील प्रसिद्ध ‘मुच्छड पानवाला’ दुकानाच्या मालकाला बेड्या ठोकण्यात आल्या. जयशंकर तिवारी याला ‘मुच्छड पानवाला’ नावाने ओळखलं जातं. अनेक हायप्रोफाइल उद्योजक, सेलिब्रेटी तसंच क्रिकेटर मुच्छड पानवाल्याचे ग्राहक होते. ड्रग्ज प्रकरणात ब्रिटीश नागरिक करण सजनानीच्या अटकेनंतर करण्यात आलेल्या चौकशीत मुच्छड पानवाल्याचे नाव समोर आले होते. जून महिन्यात फॉरेन पोस्ट ऑफिस या ठिकाणी छापा मारला असता, त्या ठिकाणी 2 किलो 200 ग्रॅम कॅनबिज अंमली पदार्थ मिळून आले होते. सदरचे अमलीपदार्थ एका निळ्या कलरच्या कार्टून बॉक्समध्ये लपविण्यात आले होते. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाची किंमत 5000 ते 8000 रुपये प्रतिग्राम असून हे पार्सल कॅनडामधील विटर येथून मुंबईला पाठवण्यात आले होते.
एनसीबीकडून सिने अभिनेते, अभिनेत्रींवर कारवाई -