महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अमली पदार्थ तस्कर मुस्तफा उर्फ टायगर एनसीबीच्याच्या जाळ्यात, गोव्यात आवळल्या मुसक्या

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई विभागाने 30 एप्रिलला गोव्यात छापेमारी केली होती. या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. त्यानंतर मुस्तफा उर्फ टायगर या फरार नायजेरियन वंशाच्या अमली पदार्थ तस्कराचा शोध एनसीबीकडून घेतला जात होता.

मुस्तफा उर्फ टायगर एनसीबीच्याच्या जाळ्यात
मुस्तफा उर्फ टायगर एनसीबीच्याच्या जाळ्यात

By

Published : May 3, 2021, 11:13 AM IST


मुंबई- मुस्तफा उर्फ टायगर या अमलीपदार्थ तस्कराला गोव्यातील अंजुना येथील कॅफे अरंबोल येथून अटक करण्यात आली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, मुंबई आणि गोवा पोलिसांच्या अंजुना पोलीस ठाण्याच्या पोलिसांकडून करण्यात आलेल्या संयुक्त कारवाईत टायगरला अटक करण्यात यश आले.

टायगर होता फरार

30 एप्रिल रोजी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई युनिटला मिळालेल्या माहितीवरून नॉर्थ गोवा येथील अरंबोल बीच जवळील नेगी कॅफे या ठिकाणी छापा मारण्यात आला होता. या ठिकाणी एनबीच्या अधिकाऱ्यांना 58 ग्राम एमफेटामाईन 15 एलएसडी ब्लॉट्स सह कोकेन , हेरॉईन सारखे अमली पदार्थ मिळाले होते . या कारवाईनंतर मुस्तफा उर्फ टायगर हा अमली पदार्थ तस्कर घटनास्थळावरून फरार झाला होता.

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी नेगी कॅफेचा केअरटेकर रणवीर सिंग याला अटक केली होती. याबरोबरच या हॉटेलच्या मालकाला चौकशीसाठी समन्स बजावले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details